सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojana in Marathi)

Sukanya Samruddhi Yojana in Marathi

मुलींचे भवितव्य उज्ज्वल आणि सुरक्षित व्हावे यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या बचत योजना राबविल्या जातात. या बचत योजनांवर आयकर सूट आणि चांगले व्याजदर सुद्धा दिले जातात. जेणेकरून लोकांना या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळून मुलींचे भविष्य सुरक्षित करता येईल.

सुकन्या समृद्धी योजना (Official Website) एक अशीच खास मुलींसाठी असलेली गुंतवणूक योजना आहे. या योजनेद्वारे, मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी दरमहा थोडी रक्कम गुंतवुन मूदतपूर्तीनंतर एक चांगली रक्कम शिल्लक पाडू शकतो. या लेखाद्वारे तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती मिळेल.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojana in Marathi)

विशेष मुलींसाठी असलेली सुकन्या समृद्धी योजना हि एक दीर्घ मुदतीची बचत योजना आहे. या योजनेचा लाभार्थी होण्यासाठीं मुळीच वय १० वर्षांपेक्षा कमी असायला हवंय. वार्षिक किमान ₹२५० आणि कमाल ₹१.५ लाख इतकी रक्कम तुम्ही तुमच्या मुलीच्या नावे या योजनेतगुंतवू शकाल तसेच या गुंतवणुकीवर 80C इनकम टैक्स अधिनियम नुसार कर सवलत सुद्धा मिळेल.

सुकन्या समृद्धी योजनेची काही वैशिष्ट्ये (SSYS Account Rules in Marathi)
 • सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खात उघडण्यासाठी मुलीचं वाट १० वर्षांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे.
 • सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते सुरु कारण्याची परवानगी फक्त मुलीच्या पालकांना किंवा कायदेशीर पालक यांनाच आहे.
 • एक परिवारातील जास्तीत जास्त २ मुलीच्या नावे या योजनेमध्यें गुंतवणूक करता येऊ शकते. जर मुली जन्मतः तिळ्या असतील तर अँडवात्मक स्थिति म्हणून तिसऱ्या मुलीच्या खात्यासाठी परवानगी आहे.
 • एका आर्थिक वर्षात किमान ₹२५० आणि जास्तीत जास्त ₹१.५ लाख जमा केले जाऊ शकतात. तुम्ही किमान रक्कम जमा करायला.
 • सुकन्या योजनेअंतर्गत मिळणारे व्याजदर हे दर तिमाहीत जाहीर केले जातात आणि सध्याच्या तिमाहीचे व्याजदर आहे ७.६%, जा दर मार्च ३१, २०२२ पर्यंत लागू आहे.
 • सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवलेल्या रकमेवरती तुम्ही आयकर सेक्शन 80C नुसार कर सवलतीस पात्र आहेत आणि त्याची कमाल मर्यादा १.५ लाख राहील.
 • सुकन्या समृद्धी योजने हि EEE कॅटेगरी मध्ये येते. म्हणजेच तुम्ही गुंतवत असलेल्या रकमेवरती, तुमच्या व्याजाच्या कमाईवर आणि मुख्य म्हणजे मुदतपूर्तीनंतर मिळणाऱ्या सर्व रकांवर तुम्हांला कुठलाही कर लागणार नाही.
 • सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते तुम्ही पोस्ट ऑफिस, राष्ट्रीयकृत आणि ठराविक खाजगी बँकेमध्ये सुद्धा सुरु करू शकता.
 • सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे बहुतांशी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड सारखेच आहेत पण फरक इतकाच आहे कि सुकन्या योजना खाते फक्त मुलींच्या नावानेच सुरु करता येते.
 • सुकन्या समृद्धी योजना तुमच्या मुलीच लग्न २१वर्षे पूर्ण होण्या अगोदर झाल्यास किंवा मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत खाते सुरु ठेवता येईल.
 • मुलीच्या उच्च शिक्षणासाठी १८ वर्षं पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यांतील जमा ५०% रक्कम काढू शकता.
 • सुकन्या समृद्धी खाते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार दुसऱ्या ठिकाणी जसे कि पोस्टातून-बँकेत किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर सुद्धा करू शकता.
 • तुम्ही दत्तक मुलीसाठी सुद्धा सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता.
सुकन्या समृद्धी खात्याची मॅच्युरिटी कॅल्क्युलेटर (SSYS Account Sample Calculator)

आता, सुकन्या समृद्धीमधून तुम्हांला कसा फायदा होऊ शकता हे बघण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. समजा, तुम्ही मुलीच्या वयाच्या दुसऱ्या वर्षी या खात्यांत दरमहा १२,५०० असें वर्षाला १.५ लाख भरायला सुरवात केली. तुम्हाला खात उघडल्याच्या पुढल्या १४ वर्षांपर्यंत हे पैसे भरता येतील आणि मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर हे खाते मॅच्युअर होणार.

या १४ वर्षात तुम्ही २१,००,००० रुपये जमा केलेत आणि खातं मॅच्युअर झाल्यानंतर तुम्हांला चक्रवाढ पद्धतीने जवळपास ₹ ५४, ३१,६७४ रुपये मिळून शकतात आणि या रकमेत ७% हा फिक्स व्याज दर पकडून साधारण ३३,३१,६७४ लाखांची भर पडेल.

हि कॅल्क्युलेशन्स फक्त अंदाज काढण्यासाठी आहेत आणि ७% हा व्याजदर पकडून केलेली आहेत पण वास्तवामध्ये इंटरेस्ट रेट प्रत्येक तिमाहीमध्ये बदलणारा आहे. सरकारतर्फे बदलणाऱ्या इंटरेस्ट रेट नुसार तुमच्या खात्यांतील मूळ रक्कम वेगळी असू शकेल.

Sukanya Samruddhi Scheme Calculator By Economic Times.

SSYS Account Sample Calculator
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे (Document Requirements to Open New SSYS Account)
 • मुलीचा पासपोर्ट साईझ फोटो
 • मुलीच जन्म प्रमाणपत्र
 • पालकांचा पासपोर्ट साईझ फोटो
 • पालकांचं आधार कार्ड
 • पालकांचं पॅन कार्ड
 • सध्याचं रेसिडेन्शियल प्रूफ
सुकन्या समृद्धी योजना खाते मुदतीपूर्वी बंद करता येते का? Premature Closure Rules for Sukanya Account
 • खाते सुरु केल्यानंतर कमीत कमी ५ वर्षांनंतर सुकन्या खाते तुम्ही बंद करू शकता
 • खातेधारक मुलीचा मृत्यु झाल्यास खाते बंद करता येईल
 • खातेधारकाला जर कुठल्या गंभीर आजारांची लागण झाल्यास, उपचारांच्या खर्चासाठी सुकन्या खाते तुम्ही बंद करू शकता
 • मुलीच्या पालकांचा मृत्यु झाल्यास खाते सुरु ठेवण्याच्या स्थितीमध्ये नसल्यास खाते बंद करता येईल

या लेखांत पुरवलेली माहिती हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. हि माहिती वाचकांच्या उपयोगासाठी, शैक्षणिक उद्देशासाठी आणि अर्थविषयक सजगता निर्मान करण्यासाठी दिलेली आहे. तरी, वाचकांनी आपल्या आर्थिक परिस्थिती आणि गरजांचा योग्य अभ्यास करून मगच स्वतःच्या गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा – आम्ही वाचकांनी केलेल्या कुठल्याही गुंतवणुकीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आमच्या Terms & Conditions वाचा.