EEE गुंतवणुक योजना (EEE Investment Schemes In Marathi)

Exempt (एक्सएम्प्ट) म्हणजे सूट किंवा सवलत.

EEE गुंतवणुक योजना (EEE Investment Schemes In Marathi)

EEE Investment Schemes

थोडक्यात EEE समजवायचं म्हणजे – गुंतवणुकीवर करसवलत, व्याजकमाईवर करसवलत आणि मुदतपूर्तीनंतर सर्व रकमेवर करसवलत – या तीनही पातळ्यांवर करसवलत मिळतें.

EEE करव्यवस्था काय आहे? What Is EEE Tax Regime in Marathi?

आपण ज्या गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करतो त्यात जर कर लागत असेल तर करकपातीनंतर आपल्या हातात येणारी रक्कम नक्कीच थोडी कमी होऊन येते. याविरुद्ध ज्या गुंतवणूक साधनांमध्ये कर सवलत असतें त्यातून मिळणार परतावा अधिक चांगला म्हणता येईल.

EEE या करव्यवस्थामध्ये आपण गुंतवणुकीच्या तीनही पातळ्यांवरती जसे की गुंतवणुकीची रक्कम, त्यातून मिळणारा परतावा आणि मुदतीनंतर मिळणारी पूर्ण रक्कम या सर्व रकमांवरती कर सवलत मिळते.

EEE प्रकारच्या गुंतवणुक योजना मुख्यतः या सरकार पुरस्कृत आहेत म्हणून त्या विश्वसनीय समजल्या जातात. याला अपवाद फक्त ELSS (Equity Linked Savings Scheme) म्युच्युअल फंड योजनांचा.

प्रकारात येणाऱ्या सर्व योजना या शक्यतो लॉन्ग-टर्म गुंतवणुकीच्या (Long-Term Investment Schemes In Marathi) आहेत म्हणजे तुम्ही या योजनांमध्ये गुंतवलेला पैसा येत्या काही (What is lock-in period in Investment in Marathi) वर्षांपर्यंत काढू शकत नाहीत – आणि हे आपण एक मुख्य कारण योजना तुम्हांला चांगल्या प्रकारे चक्रवाढ पद्धतीने परतावा देतात.

EEE गुंतवणुक योजना / EEE Tax Exemption Schemes in India

1. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF in Marathi) –

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) अर्थात पीपीएफ योजना एक सरकार पुरस्कृत योजना आहे. या योजनेचा कालावधी १५ वर्षांपर्यंत असून, मॅच्युरिटी नंतर हि योजना दर ५ वर्षांच्या मुदतीसाठी नूतनीकृत करता येते.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेसाठी व्याजाचा दार सरकारतर्फे दर तिमाहीनंतर घोषित केला जातो.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड गुंतवणूक योजनेत तुम्ही किमान ₹५०० आणि कमाल ₹१.५ लाख या मर्यादेत पैसे गुंतवू शकतात. हि योजना फक्त निवासी भारतीय नागरीकांसाठी उपलब्ध आहे. अनिवासी भारतीय या योजनेत नवीन गुंतवणुक करू शकत कानी, परंतु अनिवासी होण्याअगोदर जण त्यांनी या योजनेत गुंतवणूक केलेली असेल, तर ते ती गुंतवणूक मॅच्युरिटी पर्यंत सुरु ठेऊ शकतात.

अधिक सखोल माहितीसाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF in Marathi) हा लेख नक्की वाचा.

2. सुकन्या समृद्धी योजना (SSYS in Marathi) –

अधिक सखोल माहितीसाठी सुकन्या समृद्धी योजना (SSYS in Marathi) हा लेख नक्की वाचा.

3. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employee Provident Fund/EPF in Marathi) –

4. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (Equity Linked Saving Scheme/ELSS in Marathi) –

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम किंवा ELSS Mutual Fund योजना या दीर्घ कालीन उद्देशांसोबत, (अपेक्षित पण खात्रीलायक नाही असा) उत्तम परतावा (long term good returns) आणि कर सवलत देतात. स्टॉक मार्केटसंबधातील गुंतवणुकीतून जोखीम स्वीकारायची तयारी असलेल्यांसाठी आणि भविष्यकालीन गरजांच्या निकडीसाठी या योजना एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. जोखीम घेण्याची तयारी नसलेल्या गुंतवणूकदारांनी यांपासून दूर राहिलेलेच बरं.

अधिक सखोल माहितीसाठी ELSS म्हणजे काय? ELSS Mutual Fund In Marathi हा लेख नक्की वाचा.

या लेखांत पुरवलेली माहिती हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. हि माहिती वाचकांच्या उपयोगासाठी, शैक्षणिक उद्देशासाठी आणि अर्थविषयक सजगता निर्मान करण्यासाठी दिलेली आहे. तरी, वाचकांनी आपल्या आर्थिक परिस्थिती आणि गरजांचा योग्य अभ्यास करून मगच स्वतःच्या गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा – आम्ही वाचकांनी केलेल्या कुठल्याही गुंतवणुकीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आमच्या Terms & Conditions वाचा.