अर्थसाक्षरतेबद्दल थोडं…

अर्थ” किंवा “पैसा” आपल्या जीवनातील सर्व रॅट रेस मागील मूळ कारण आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपलं अर्थकारण आपण कसं सांभाळावं किंवा स्वतःचा पैसा स्वतःसाठी कसा वापरावा हे याच शिक्षण आपली शैक्षणिक पद्धती आपल्याला योग्य प्रकारे देत नाही. त्यामुळं अगदी शिकली सवरलेली लोक सुद्धा अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे अचानक कोलमडून जातात. गमावलेला पैसा कदाचित परत मिळवता येत सुद्धा असेल पण अश्या आर्थिक संकटांतुन विवंचनेत सापडलेला मनुष्य आर्थिक दृष्ट्या काही वर्षे फेकला जातो – आणि वेळेच झालेलं हे नुकसान खचीतच भरून येत नसतं.

तर, आपल्या मायबोली मराठीमध्ये, अर्थसाक्षरता विषयावर आणि पैसा गुंतवणुक, आर्थिक नियोजन आणि पैसे व्यवस्थापनाबद्दल माहिती लोकांना करून देता यावी यासाठी “पैसा अडका” ब्लॉगचा हा सर्व खटाटोप.

अर्थसाक्षरता म्हणजे काय?

आपण बऱ्याच मेहनीतीने पैसे कमावतो पण त्या पैश्यांचा तितक्याच काळजीपुर्वक वापरत करत नाही. हो, काळजीपुर्वक वापरत करत नाही म्हणायचा हेतु असा यासाठी अजुनही बरीच शिकली सावरलेली व्यक्ती पैश्याचा वापराबद्दल (अनेकदा) थोडा दुर्लक्षितपणा करते. थोडक्यात उदाहरण बघायचं म्हणजे –

  • पैश्याचा योग्य ठिकाणी वापर
  • इन्शुरन्स आणि गुंतवणुकीची गल्लत
  • बचत कि गुंतवणूकीबद्दल स्पष्टता नसणं
  • क्रेडिटकार्डाचा विनीयोग
  • वास्तविक गरजांच्या अभ्यासाशिवाय केलेली गुंतवणूक

अश्या आणि इतर बऱ्याच आर्थिक बाबींशी संबंधित गोष्टीबद्दल योग्य माहिती नसणं किंवा यांबद्दल योग्य माहिती घेतल्याशिवायचं आपल्या पैश्याचा वापर करणं आणि याचा परिणाम असा होतो कि आपण आपला पैसे एकतर खर्च करून बसतो किंवा अश्या ठिकाणी गुंतवतो जिथुन आपल्याला आपल्या वास्तविक गरजेच्या परोक्ष परतावा मिळतो.

चुकीच्या ठिकाणी गुंतवलेल्या पैश्यामुळे आपल्याला कदाचित खूप नुकसान होणार नाही किंवा आपल्या पैसा कदाचित शून्य पण होणार नाही पण यामुळे होणार वेळेचं नुकसान हे जास्त असेल आणि हीच गुंतवणूक जर आपण योग्य ठिकाणी आपल्या गरजांचा नीट आढावा घेऊन केली तर वेळेनुसार ती आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त परतावा सुद्धा मिळवून देऊ शकेल – म्हणून अर्थसाक्षरता महत्वाची आहे.

बचत (Savings)
पर्सनल फायनान्स (Personal Finance)
मासिक खर्च (Monthly Budgeting)
क्रेडिट कार्ड्स (Credit Cards)
निवृत्ती व्यवस्थापन (Retirement Planning)
गुंतवणूक योजना (Investment Plans)
म्युच्युअल फंडस् (Mutual Funds)