पैसाअडका – आमच्याविषयी थोडक्यात

पैसाअडका – आमच्याविषयी थोडक्यात

माझ्या “अर्थ” विषयक “पैसाअडका” (Marathi blog on Personal Finance) ब्लॉगवर आपलं स्वागत आहे.

नमस्कार, चरितार्थ चालवण्यासाठी मी गेली कित्येक वर्षं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे. ब्लॉगिंग, वाचन थोडं लेखन वगरीची आवड जोपासता येण्यासाठी काही ब्लॉग्सची सुद्धा निर्मिती केलेली आहे.

अर्थ” किंवा “पैसा” आपल्या जीवनातील सर्व रॅट रेस मागील मूळ कारण आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपलं अर्थकारण आपण कास सांभाळावं किंवा स्वतःचा पैसा स्वतःसाठी कसा वापरावा हे याच शिक्षण आपली शैक्षणिक पद्धती आपल्याला योग्य प्रकारे देत नाही. त्यामुळं अगदी शिकली सवरलेली लोक सुद्धा अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे अचानक कोलमडून जातात. गमावलेला पैसा कदाचित परत मिळवता येत सुद्धा असेल पण अश्या आर्थिक संकटांतुन विवंचनेत सापडलेला मनुष्य आर्थिक दृष्ट्या काही वर्षे फेकला जातो – आणि वेळेच झालेलं हे नुकसान खचीतच भरून येत नसतं.

तर, आपल्या मायबोली मराठीमध्ये, अर्थसाक्षरता विषयावर आणि पैसा गुंतवणुक, आर्थिक नियोजन आणि पैसे व्यवस्थापनाबद्दल माहिती लोकांना करून देता यावी यासाठी “पैसा अडका” ब्लॉगचा हा सर्व खटाटोप.

इंटरनेटवर आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते पण आर्थिक विषयाला अनुसरून सर्व माहिती एका संकेतस्थळावर उपलब्ध व्हावी म्हणुन आणि तांत्रिक संज्ञा टाळून सोप्या भाषेत कुणाच्याही कामी यावी असा उद्देश ठेऊन मी या ब्लॉगसाठी प्रयत्न करत आहे.

या ब्लॉगवर मी कुठल्याही उत्पादनाची जाहिरात करत नाही किंवा अर्थविषयक उत्पादनं विकत नाही आणि त्यातून मला कुठलंही कमिशन मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. या ब्लॉगबर प्रकाशित माहिती स्वानुभवातून आणि इंटरनेटवरून योग्य सोर्सवरून पडताळून घेतलेली आहे. अर्थविषयक बाबी बऱ्याचदा बदलत असतात त्यामुळं शक्य असेल तितकी हि माहिती अद्ययावत राहील याचा प्रयत्न आहेच.

या ब्लॉगचा मुख्य उद्देश या अर्थविषयक पारदर्शक माहिती आमच्या वाचकांना देणं आणि तिचा वापर आपण अर्थविषयक गैरसमज दूर करणे आणि अर्थसाक्षरता पसरवणे हा आहे.

आपण पैश्याच्याबाबतीत अर्थसाक्षर असाल, सजग असाल तर स्वतःच्या पैश्याचा योग्य उपयोग, गुंतवणुक करून स्वतःचा फायदा करून घेऊ शकता आणि फसवणूक किंवा चुकीच्या गुंतवणुकीपासून दूर राहू शकता.