पर्सनल फायनान्स म्हणजे काय? What is Personal Finance

पर्सनल फायनान्सबद्दल अगदीच थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन करून आपले सद्य परिस्थितले खर्च आणि भविष्यकालीन गरजांच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी योग्य बचत, गुंतवणुक करणं.

What is Personal Finance

पर्सनल फायनान्स म्हणजे काय / What is Personal Finance?

पर्सनल फायनान्स बघितलं तर एक मोठी आणि म्हटली तर थोडी किचकट बाब आहे – पण ती समजून घेण्यासाठी तितकीशी कठीण नाही. थोडी सजगता आणि अभ्यास केला तर आपण आपल्या खर्चाचं, बचतीचे आणि आपल्याला अनुरूप गुंतवणुकीचे नीट नियोजन करू शकतो. वैयक्तिक आणि कौटुंबिक खर्चाचं योग्य नियोजन, आपल्या सध्या स्थितीतील उत्पन्नाच्या अनुरूप केलेली बचत आणि कुठलीही गुंतवणुक करतांना भविष्यातल्या आपल्या असलेल्या किंवा वाढणाऱ्या गरजांचा नीट अभ्यास करून निवडलेली योग्य फिनान्शियल इंस्ट्रुमेंट्स या सगळ्या गोष्टींच्या एकत्रीत परिणाम आपण आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र (Financial Independence) होण्यात करून घेऊ शकतो.

पर्सनल फायनान्सचे महत्व

पैसे येतो एका मार्गाने पण जातो अनेक मार्गांनी असा बहुतेक लोकांचा अनुभव आहे. म्हणजेच उत्पन्नाच्या मर्यादीत स्रोतांमधून येणार पैसा आपल्या गरजांवरती किंवा नियमित होणाऱ्या खर्चांमधून खर्च होऊन जातो. वाढती महागाई, लोकसंख्या विस्फोट, बदलती लाईफस्टाईल आणि अनेक गोष्टींमधून आज आपले खर्च खूप आहेत जे आधीसुद्धा होते. पण, काही वर्षांपूर्वी मिळणारी (परिवारातील जेष्ठ व्यक्तींना) पेन्शन सुविधा, बॅंकेतून मिळणारे चांगले व्याजदर अश्या काही गोष्टींमधून खर्चाच्या अनेक बाबी निभावून जात होत्या.

वैयक्तिक वित्त व्यवस्थापनाचे महत्वाचे घटक (Components of Personal Finance)

वैयक्तिक वित्त व्यवस्थापनाचा विचार केला असता आपण ते या महत्वाच्या वैयक्तिक वित्त घटकांमध्ये परिभाषित करू शकतो –

1. उत्पन्न (Income)

पर्सनल फायनान्समध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे तुमचं नियमित उत्पन्न. तुमच्या नियमित उत्पन्नाचा स्रोत भरवशाचा आणि स्थिर असणं गरजेचं आहे आणि हे उत्पन्न आपण तुमच्या नोकरी / व्यवसातून गृहीत धरू शकतो.

नियमित उत्पन्ना व्यतिरिक्त आपल्याला मिळणारे काही अनियमित उत्पन्न जसं बोनस, अनपेक्षित झालेला आर्थिक फायदा यांचा आपल्याला आधी अंदाज नसतो त्यामुळं आपण या रकमेच्या खर्चाची आधी आखणी करू शकत नाही पण हा पैसा हातात आल्यानंतर मात्र आपण त्याचा योग्य ठिकाणी उपयोग करू शकतो.

एक्सट्रा इन्कम हवंय? नोकरी व्यतिरिक्त एक्सट्रा इन्कम कमावण्याची साधनं बघा. 

2. खर्चाचे अंदाजपत्रक (Expense Budgeting)

आपल्या नियमित उत्पमनातून सगळ्यात महत्वाचा आणी टाळता न येणारा खर्च म्हणजे आपल्या आवश्यक गरजा ज्या ठराविक असतात आणि वाढत्या वयासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांतून त्या वाढू पण शकतात – म्हणजेच दरमहा आपल्याला आवश्यक गरजांसाठी ठराविक रक्कम लागतेच.

तुम्हाला इमर्जन्सी फंडाची गरज का आहे आणि त्यासाठी कुठे गुंतवणूक करावी?

आपल्या मासिक उत्पन्नातून अश्या आवश्यक गरजांसाठी खर्च करून उरलेला पैसा आपण बचत म्हणून गृहीत धरतो पण असं सहसा होत नाही कारण कितीही हात ओढून धरला तरी आपण अचानक अनावश्यक खर्च करून बसतो. असा अनावश्यक खर्च थोड्या रकमेचा असला तर ठीक पण आपण जर मोठी रक्कम अचानक खर्च केली तर मात्र आपलं महिन्याचं बजेट कोलमडतं.

3. कर व्यवस्थापन (Tax Management)

वैयक्तिक व्यवस्थापनातला दुसरा महत्वाचा घटक म्हणजे कर व्यवस्थापन. कर भरणं आवश्यक आहेच पण आपण उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांचा योग्य वापर करून आपलं करपात्र उत्पन्न कमी करून घेऊ शकतो.

तुमचं उत्पन्न जितकं जास्त तितका जास्त कर भरावा लागतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही पण जर आपण चालू आर्थिक वर्षातील सुविधांचा नीट वापर करून गुंतवणुकीच्या माध्यमातून आपलं करपात्र उत्पन्न वाचवू शकतो.

कर वाचवण्यासाठी गुंतवणूक कुठं आणि कशी करावी? हा प्रश्न जवळपास प्रत्येकाला पडतोच आणि त्याच उत्तर मात्र प्रत्येकासाठी आणि दरवर्षी वार्षिक अंदाजपत्रकानुसार (थोड्या प्रमाणात) बदलत असते.

सरकारी योजनांनुसार कर वाचवण्यासाठी काही प्रावधान केले आहेत –

  • गुंतवणुकीवर मिळणारी सवलत (Section 80C)
  • आरोग्यविम्याच्या हप्त्यावर मिळणारी सवलत (80D)
  • गृहकर्जाच्या व्याजावर २ लाखांपर्यंत सवलत (Section 24)
  • चॅरिटीसाठी डोनेशन (80G)
  • बचतखात्यावरील व्याजावर मिळणारी १०,००० पर्यंत सवलत (Section 80TTA)

आणि असे काही सर्वाधिक वापरले जातात.

4. आर्थिक सुरक्षितता (Financial Security)

आर्थिक सुरक्षितता महत्वाची का आहे याच उत्तर आपल्याला कोरोना काळात मिळालंच आहे. अकस्मात येणाऱ्या अडचणी आणि खर्च हे आपल्याला आर्थिक दृष्ट्या तोडून टाकतात आणि आपण केलेल्या आर्थिक प्रगतीच्या काही वर्षे मग सुद्धा घेऊन जातात.

आपल्या परिवारासाठी वित्त व्यवस्थापन करतांना आर्थिकबाजू सक्षम आणि सुरक्षीत करण्यासाठी आपण वेगवेगळ्या विमा उत्पादनांची मदत घेतो. आपल्या गरजेनुसार विमा उत्पादनं निवडताना सुद्धा आपली गल्लत होऊ शकते पण या उत्पादनांमधला फरक समजून घेणे महत्वाचं आहे.

आर्थिक सुरक्षितता मिळवण्यासाठी आपण मुख्यतः लाइफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स यांचा विचार करतो. आजकाल घरांच्या किंमती आवाक्याबाहेर जात असतांना आपण घरासाठी कर्ज घेतले असेल तर होम लोन इन्शुरन्स सुद्धा आवश्यक धरला जातो.

विम्याच्या या सर्व प्रकारांव्यतिरिक्त सुद्धा अजून काही इन्शुरन्स उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत पण यांची गरज मात्र व्यक्तीनुसार बदलत असते.

5. बचत ( Saving)

बचत काय तर आज खर्च न केलेला पैसा किंवा काही काळासाठी टाळलेला खर्च किंवा आपल्या उत्पन्नातून खर्च वजा करून सध्या शिल्लक असलेले पैसे म्हणजे सुद्धा आपण बचत म्हणु शकतो. बचत रोख रकमेच्या रूपात किंवा बँकेत जमा असते. तुमच्या नियमित उत्पन्नातून बचत आवश्यक आहेच पण जास्त बचत करून आपला खूप चांगला फायदा होत नाही कारण फक्त बचतीवर मिळणारे (व्याजाच्या रूपानं ) उत्पन्न अतिशय कमी तर असतेच पण ते महागाईच्या दरापेक्षा फारच माफक असते. थोडक्यात काय तर फक्त बचत करून साठवलेला पैसा येणाऱ्या वेळेसोबत आपली किंमत खरतर कमी करीत असतो पण यामुळं बचतीचे महत्व कमी होत नाही. आपल्या उत्पन्नांतून आपण जर चांगली बचत करू तीच रक्कम आपण योग्य ठिकाणी गुंतवणुक करू शकतो..

6. गुंतवणूक (Investment)

बचत आणि गुंतवणूक या दोन्ही अगदी भिन्न गोष्टी आहेत पण आपण वाचवलेले पैसे हि आपली एक गुंतवणूकच आहे असं मानणारी काही व्यक्ती अजून आहेत. खरे तर आपली बचतीचे मुल्य येणाऱ्या वेळेसोबत आणि वाढत्या महागाईसोबत कमी होत असतं कारण त्यावर येणार परतावा हा आपल्याला वाढत्या महागाईपेक्षा जास्त नसतोच.

आपल्या हातात असलेल्या १००० रूपातून आपण आज कि खरेदी करू शकतो तीच खरेदी आपण येत्या काही महिन्यात/वर्षी नाही करू शकत कारण वाढत्या महागाईमुळं त्या वस्तूची किंमत १००० पेक्षा जास्त झालेली असते – सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे आज आपण गुंतवलेले पैसे जर (कमीतकमी) वाढत्या महागाईच्या प्रमाणात किंवा त्यापेक्षा जास्त रेटने वाढणार असतील तरच आपण महागाईमध्ये तग धरू शकू, आणि यासाठी एकमेव उपाय म्हणजे – योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे.

हो योग्य गुंतवणूक असंच म्हटलंय. याचा अर्थ कुठली गुंतवणुक अयोग्य किंवा चुकीची असते असं मात्र नाही. योग्य गुंतवणुकीचा अर्थ इथं ती गुंतवणूक तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या, गरजेच्या अनुरूप आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी असावी असं घ्या.

आता गुंतवणूक करणं म्हणजे कुठल्याही उपलब्ध असलेल्या साधनांमध्ये तुम्ही पैसे अडकवू शकता पण त्यातून तुम्हाला फायदा होईलच असे नाही. गुंतवणूक करीत असतांना तुम्ही काही गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे आणि तुम्हाला आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मदतकारक अशीच निवडली पाहिजे.

7. कर्ज व्यवस्थापन ( Debt Management)

8. निवृत्ती व्यवस्थापन (Retirement Planning)