Passive Income मिळवण्याचे मार्ग (6 Ways to Earn a Passive Income in Marathi)

आपल्या प्रत्येकासाठी नोकरी किंवा व्यवसाय पैसे कमावण्याचं मुख्य साधन आहेत. नोकरीच्या माध्यमातून आपण दरमहा ठराविक उत्पन्न घेत असतो आणि कुणाचा व्यवसाय असेल तर मग मात्र नक्की उत्पन्न किती असेल ते निश्चित सांगता येत नाही. या दोनही माध्यमांव्यतिरिक्त भाड्याचे उत्पन्न, व्याज आणि लाभांश इत्यादी उत्पन्नाची बरीच साधनांतून कुणी कुणी उत्पन्न मिळवीत असतात पणयासाठी त्यांनी अगोदर आगाऊ गुंतवणूक वगैरे करून याची सोय केलेली असते.
प्रत्येक महिन्यात अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी वेगवेगळ्या मालमत्ता वर्गात योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर हीच गुंतवणूक तुम्हांला अधिक उत्पन्न देण्याचे साधन बनू शकते.
तर, पॅसिव्ह इन्कम किंवा निष्क्रिय उत्पन्न म्हणजे काय? असे उत्पन्न ज्यासाठी तुम्हाला सक्रियपणें काम करण्याची आवश्यकता नसते म्हणून ते निष्क्रिय उत्पन्न. सक्रिय काम म्हणजे काम केल्यानंतर येणार मोबदला या काम केलं नाही तर थांबू शकतो पण पॅसिव्ह किंवा निष्क्रिय उत्पन्न याच्या उलट काम करते.
तुम्ही केलेली गुंतवणूक तुम्ही कुठलीही इतर मेहनत न घेता व्याजाच्या रूपात वाढतं राहते किंवा तुम्ही प्लॉट वगैरे मध्ये केलेली गुंतवणूक सुद्धा तुमच्या कुठल्या मेहनतीशिवार वेळेनुरूप तुम्हांला चांगला परतावा देऊ शकते – हि पॅसिव्ह उत्पन्नाची नेहमीच्या बघण्यातली उदाहरणं आहेत.
आजचा विचार केला तर इंटरनेट क्रांती झाल्यापासून आपल्या डिजिटल लाईफ मध्ये असें अनेक नवीन पर्याय उपलब्ध आहेत ज्यांचा वापर करून आणि सुरवातीला थोडी म्हणता घेऊन पॅसिव्ह इन्कम मिळवण्याचे चांगले साधन तुम्ही स्वतःसाठी विकसित कसू शकता – या लेखाचा प्रपंच याचसाठी.
Passive Income मिळवण्याचे मार्ग (How to Earn a Passive Income in Marathi)
1. ब्लॉगिंग
ब्लॉगिंग आज फारच लोकप्रिय होतं आहे आणि याच कारण म्हणजे तुम्हांला तुमचे विचार, लेखन मुक्तपणे इंटरनेटवर मांडता येतात. तुमचं लेखन जर विशिष्ट्य विषयाला धरून असेल ज्याची लोकांमध्ये चांगली मागणी आहे तर याचा वापर करून तुम्ही चांगली ऑरगॅनिक ट्रॅफिक मिळवू शकत असाल तर या वाचकाचा फायदा तुम्ही संभाव्य ग्राहक म्हणून सुद्धा करू शकाल. जितके तुमचे कन्टेन्ट लोकांच्या पसंतीला पडले कि तुम्ही ब्लॉग मॉनेटायझेशन करू शकता – एफिलिएट मार्केटिंग, उत्पादनांची जाहिरात किंवा रिव्ह्यू, तुम्ही विशेष सेवा देऊन अश्या कितीतरी पद्धती आहेत ज्यातून तुम्हांला पैसे मिळवता येतील.
2. फ्रीलांसिंग
तुमच्याकडं कुठलाही व्यावसायिक कौशल्य किंवा कुठल्या विषयात तुम्ही एक्स्पर्ट असाल तर तुमच्या फावल्या वेळात तुम्ही फ्रीलांसिंग करून आपल्या ज्ञानाचा फायदा करून घेऊ शकता. यासाठी कुठल्याच विषयाला बंधन नाही. आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात अनेक गोष्टींमध्ये अडचत येत असते आणि आपण त्याच उत्तर शोधात असतो – याचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या विषयामध्ये चांगली सेवा प्रदान करू शकता. अगदी आठवड्यातील शेवटचे दोन दिवस शनिवार रविवार किंवा नोकरीच्या वेळानंतर तुम्ही थोडा वेळ काढून हे काम करू शकाल. सुरवातीला जॅम बसण्यासाठी थोडा वेळ लागेल पण पॅसिव्ह उत्पन्न मिळवण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे.
3. युट्युब चॅनेल
तुमच्या लक्षात आलं असेल तर कोरोना काळानंतर आपल्यापैकी बहुतेकांचा वेळ ऑनलाईन जातो. वेगवेगळ्या विषयांवरील माहिती वाचण्या पाहण्यात आपल्यापैकी बरीच लोक वेळ घालवतात. युट्युब चॅनेल सुरु करण्यासाठी तुम्ही कुठल्या विषयांत खरोखर तज्ज्ञ असणं गरजेचं नाही तुम्ही मनोरंजन म्हणून संगीत, शिकवण्या, रेसिपि, विनोद, चित्रपट रिव्यू अश्या कितीतरी विषयांचा विचार करून विडिओ कन्टेन्ट बनवू शकता. ब्लॉग मॉनेटायझेशन बद्दल सांगितल्या प्रमाणेच गुगलच्या ऍडसेन्स प्रोग्रॅमचा वापर करून किंवा पेड प्रोमोशन घेऊन तुम्ही तुमच्या ट्रॅफिकच्या अनुरूप कमाई करू शकता.
तुम्ही बनवलले व्हिडीओ जितके चांगले आणि जास्त ट्राफिक खेचु शकतील तितकी तुमची कमाई वाढण्याची शक्यता राहील – तेव्हा योग्य अभ्यास करून कुठली कन्टेन्ट जास्त चालतात हे आधी माहिती करून मग तुम्ही युट्युब चॅनेल सुरु करू शकता.
4. ई-बुक
यासाठी तुमच्या कडे चांगलं लेखन कौशल्य आणि विषय असणे मात्र गरजेचं आहे. कुठलंही पुस्तक लिहिणं तास फार वेळखाऊ काम आहे पण जात तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमचा ई-बुक प्रकाशीत केल्यानंतर जर ते कोकणच्या पसंतीला उतरलं तर वर्षानुवर्षं तुम्ही त्यातून रॉयल्टी आणि विक्रीच्या नफ्यातून पैसे मिळवू शकता.
5. छंद व्यवसायामध्ये बदला
कुठलाही व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला नेहमीच युनिक कल्पनेची गरज नसते. तुम्ही तुमचा हॉबी हवंय व्यवसायात सुद्धा बदलू शकता. तुम्ही जर कुठल्याही हस्तकलेच्या वस्तू, पेंटिंग्ज किंवा दागिने, केक्स, होममेड उत्पादनं तयार करता येत असल्यास ते ऑनलाईन विका. ऍमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा अशीच इतरही बरीच पोर्टल ही उत्पादने विकण्यात मदत करतात.
इतकाच नाही तर तुम्ही या हॉबी इतरांना शिकवण्यासाठी क्लासेस वगैरेचा सुद्धा विचार करू शकता.
6. प्रोजेक्ट वर्कमध्ये सहाय्य करा
बरेच इंजिनिअरिंगचे किंवा माहिती तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थी त्यांच्या प्रोजेक्टसाठी चांगल्या कल्पना, मार्गदर्शनाच्या शोधात असतात, तुम्ही याच शाखेत काम करत असाल किंवा तुम्हांला या गोष्टींचं नॉलेज असेल तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन देऊ शकता.
या लेखांत पुरवलेली माहिती हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. हि माहिती वाचकांच्या उपयोगासाठी, शैक्षणिक उद्देशासाठी आणि अर्थविषयक सजगता निर्मान करण्यासाठी दिलेली आहे. तरी, वाचकांनी आपल्या आर्थिक परिस्थिती आणि गरजांचा योग्य अभ्यास करून मगच स्वतःच्या गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा – आम्ही वाचकांनी केलेल्या कुठल्याही गुंतवणुकीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आमच्या Terms & Conditions वाचा.