पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF in Marathi)

PPF In Marathi

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) अर्थात पीपीएफ हि भारत सरकार पुरस्कृत गुंतवणूक योजना आहे. PPF योजना 1968 मध्ये वित्त मंत्रालयाच्या राष्ट्रीय बचत संस्थेने सुरू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश गुंतवणूकदारांना दिर्घमुदतीसाठी गुंतवणुकीला प्रोत्साहित करून सेवानिवृत्तीचे नियोजन देणे असा होता/आहे.

PPF योजनेच्या प्रारंभापासून ही गुंतवणूक फार लोकप्रिय आहे. पीपीएफ हे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी सर्वोत्तम कर-प्रभावी गुंतवणूकीचे साधन मानले जाते.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF in Marathi)

आधी सांगितल्याप्रमाणे PPF योजना सरकार पुरस्कृत असल्यामुळे ती सुरक्षित नि निश्चित परताव्याची हमी देते. तसेच PPF हि Exempt-Exempt-Exempt (EEE) प्रकारांत मोडते. Exempt म्हणजे सूट.

Exempt-Exempt-Exempt संकल्पना थोडक्यात स्पष्ट करायची म्हणजे (EEE Investment Benefits)-
 • PPF योजनेमध्ये एका वर्षातील कमाल दीड लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीला आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत वजावट मिळते.
 • PPF खात्यावर जमा होणारे वार्षिक व्याज करमुक्त असते.
 • PPF च्या १५ वर्षांच्या मुदतपूर्तीनंतर मिळणारी धनराशी करमुक्त आहे.
पीपीएफ खात्याची वैशिष्ट्ये (PPF Account Rules in Marathi)
 • पीपीएफ ही १५ वर्षांच्या मुदतीसाठीची दीर्घ मुदतीची गुंतवणूक योजना आहे. पीपीएफ खातं उघडल्यापासून पुढील १५ वर्षं पूर्ण होईपर्यन्त या खात्यातून तुम्ही पैसे काढू शकत नाही. अर्थात, यासाठी काही अपवाद खालीलप्रमाणे –
 • योजनेच्या मुदतीमध्ये खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खातं बंद करून खात्यातील जमा शिल्लक राशी नामनिर्देशित व्यक्तीला (Nominee) किंवा खात्यात नामनिर्देशित नसल्यास कायदेशीर वारसांना(legal hairs) दिले जाते.
 • PPF खात्याची वर्षांच्या मुदतपूर्तीनंतर तुमची इच्छा असल्यास तुम्ही PPF खातं ५ वर्षांच्या मुदतीसाठी पुन्हा सुरु ठेऊ शकतात आणि हे तुम्ही हवं तितक्या वेळेला करू शकतात.
 • नियमानुसार एक व्यक्ती फक्त एक आणि एकचं PPF खातं उघडू शकते जे तुमच्या पॅनकार्ड (Pan card) आणि आधार कार्डाशी (Aadhar Card) जोडले जाते. त्याशिवाय कुठलाही पालक आपल्या अल्पवयीन मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर खाते उघडू शकते – पण दोन्ही खात्यांची मिळुन एका वर्षाची गुंतवणुकीची मर्यादा हि दीड लाखांपर्यंत राहील, तुम्हांला ती वाढवुन मिळणार नाही. त्यामुळं कर वाचवण्यासाठी तुम्ही एकापेक्षा जास्त खाती उघडण्याचा विचार करत असाल तर ते शक्य नाही.
 • पीपीएफ चे संयुक्त खाते उघडण्याची सुविधा नाही येत नाही (PPF cannot be opened as joint account) परंतु तुमच्या खात्याला नामनिर्देशन देण्याची सुविधा दिलेली आहे.
 • एका आर्थिक वर्षात तुम्ही किमान ५०० रुपये भरून खातं सुरु ठेऊ शकता आणि कमाल गुंतवणुक मर्यादा १,५०,००० रुपये आहे. हि गुंतवणुक एकरकमी किंवा १२ किंवा त्यापेक्षा कमी हप्त्यात केली जाऊ शकते.
 • एका आर्थिक वर्षात किमान ठेव न केल्यास तुमचं खातं निष्क्रिय केलं जात आणि ५० रुपये दंड तुम्ही ते पुनश्च सुरु करून घेऊ शकता. लक्षात ठेवा निष्क्रिय खात्यांवर तुम्ही कर्जाची सोय मिळणार नाही.
 • महिन्यातील ५ व्या आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी खात्यात उपलब्ध असलेल्या सर्वात कमी रकमेवर व्याज मोजले जाते. म्हणून प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला किंवा त्यापूर्वी पीपीएफ खात्यात पैसे जमा करण्याचा सल्ला दिला जातो.
 • वित्त मंत्रालयाने तिमाही आधारावर पीपीएफ खात्याचा (Quarterly Interest declared on PPF scheme) व्याज दर जाहीर केलेला असतो. वर्षाचे एकूण व्याज फक्त आर्थिक वर्षाच्या शेवटी ३१ मार्च ला पीपीएफमध्ये जोडले जाते. फक्त व्याज जमा केले जाते.
 • PPF योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेमार्फत खातं उघडू शकतात. तुम्ही पोस्ट ऑफिसात खातं उघडणार असाल तर तुम्हांला कुठल्याही कामांसाठी तिथं चकरा मारण्याची तयारी ठेवा. त्यापेक्षां बऱ्याचं बँक तुम्हाला या सर्व सेवा ऑनलाईन देतात आणि तुमचं खातं वापरणे तुम्हाला थोडं सोयीचं होत – हा माझा अनुभव आहे.
 • पीपीएफ खाते पोस्ट ऑफिसमधून बँकेत किंवा त्याउलट बँकेतून पोस्ट ऑफिसात हस्तांतरित करण्याची परवानगी आहे.

तुम्ही तुमच्या मुलांसाठी सुद्धा PPF खाती उघडू शकता परंतु तुम्हांला मुलगी असल्यास तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचा विचार करू शकता. हि योजना खास मुलींसाठी बनवलेली आहे आणि थोड्याफार फरकाने सारखीच काम करते. अधिक माहिती घेण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना – संपूर्ण माहिती लेख नक्की वाचा.

अनिवासी भारतीय आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड गुंतवणुक (Is PPF Account allowed for NRI)

नवीन पीपीएफ खात उघडण्याची परवानगी फक्त स्थानिक भारतीय नागरिकाला आहे.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचे नियम अनिवासी भारतीय नागरिकांसाठी नुकतेच थोडे बदलले आहेत. पूर्वी अनिवासी भारतीय भारतात नवीन PPF खाते सुरु करू शकत होते परंतु आता नव्या नियमांनुसार अनिवासी भारतीय नवीन पीपीएफ खातं उघडू शकत नाहीत (NRI can not open new PPF account).

पण अनिवासी होण्यापूर्वी जर कुणी पीपीएफ खातं सुरु केलेले असेल तर रहिवासाची स्थिती अनिवासी झाल्यानंतर सुद्धा ते खातं सुरु ठेऊ शकतील, आपल्यासुरु असलेल्या खात्यात नवीन भरणा करू शकतील. पण खात्याच्या मॅच्युरिटीनंतर त्यांना ५ वर्षांच्या नूतनीकरणाची सोय उपलब्ध नाही.

या लेखांत पुरवलेली माहिती हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. हि माहिती वाचकांच्या उपयोगासाठी, शैक्षणिक उद्देशासाठी आणि अर्थविषयक सजगता निर्मान करण्यासाठी दिलेली आहे. तरी, वाचकांनी आपल्या आर्थिक परिस्थिती आणि गरजांचा योग्य अभ्यास करून मगच स्वतःच्या गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा – आम्ही वाचकांनी केलेल्या कुठल्याही गुंतवणुकीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आमच्या Terms & Conditions वाचा.