ELSS म्हणजे काय? ELSS Mutual Fund In Marathi

ELSS म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम / Equity Linked Saving Scheme.

तुम्हाला म्युच्युअल फंड नक्की काय आहेत? याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही माझा हा लेख नक्की वाचा.

ELSS म्हणजे काय? ELSS Mutual Fund In Marathi
ELSS Mutual Fund In Marathi

आज बाजारात अनेक प्रकारची म्युच्युअल फंड्स उपलब्ध आहेत आणि यापैकी बहुतेक फंडातल्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा सध्याच्या प्राप्तीकर कायद्यानुसार करपात्र आहे. तुम्हाला या फंडातल्या दीर्घकालीन गुंतवणुकीतून उत्तम रिटर्न्स मिळतात पण त्याच बरोबर भक्कम कर सुद्धा भरावा लागतो हे पण सत्य आहे.

याला अपवाद आहे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम किंवा ईएलएसएस म्युच्युअल फंड योजनांचा. ईएलएसएस म्युच्युअल फंड योजनांची संकल्पना थोडी वेगळी आहे आणि त्यामुळंच तुमच्या आर्थिक नियोजनांमध्ये याचा तुम्ही विचार करायला पाहिजे.

ईएलएसएस म्युच्युअल फंड योजना आपल्या या वैशिष्ट्यांमुळे इतर म्युच्युअल फंडांपासून आपला वेगळेपण जपतात –

  1. गुंतवणुकीवर १.५ लाखांपर्यंत करसवलत पात्र
  2. किमान ३ वर्षांचा लॉक-इन पिरियड
  3. मॅच्युरिटी नंतर १ लाखांपर्यंतच्या रकमेवर करसवलत

चला, थोड्या विस्तारपूर्वक या संकल्पना समजुन घेऊया.

ईएलएसएस म्युच्युअल फंड कर बचतीसाठी (ELSS For Tax Savings) सुद्धा ओळखले जातात. तुम्ही तुमच्या वार्षिक उत्पन्नातून १.५ लाखांपर्यंत जर या योजनेमध्ये गुंतवू शकत असाल तर तुम्हाला १.५ लाखांपर्यंत करसवलत मिळु शकेल. या योजनेमध्यें किती पैसे गुंतवावेत याला कामं मर्यादा नाही पण कर सवलत मात्र एका आर्थिक वर्षात १.५ लाखांपर्यंतच मिळू शकेल. यापेक्षा जास्त गुंतवणूक तुम्ही करत असाल तर त्यावर कुठलीही सवलत मिळणार नाही.

ईएलएसएस म्युच्युअल फंड एक दीर्घ मुदतीची गुंतवणूक(ELSS is long term investment scheme) योजना आहे जी तिच्या नावाप्रमाणे इक्विटी(equity) किंवा इक्विटीसंलग्न (equity-related instruments) अश्या साधनांमध्ये तुमचे पैसे गुंतवते. अश्या साधनांतून योग्य परतावा लगेच मिळत नाही म्हणुन या योजनेचा किमान लॉक-इन (lock-in period) कालावधी हा ३ वर्षांचा ठेवलेला आहे. तुम्ही एकदा केलेली गुंतवणुक त्या दिवसापासून पुढील ३ वर्षांसाठी कुठल्याही कारणांमुळे तुम्हाला काढता येणार नाही. मात्र तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ती गुंतवणूक सुरु ठेऊ शकता किंवा हवी असल्यास काढू पण शकता.

या लॉक-इन कालावधीमुळे (lock-in concept in ELSS in Marathi) अनेकांचा गोंधळ उडतो आणि ती थोडक्यात समजण्यासाठी हा तक्ता बघा.

elss lockin in marathi

आता, दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो तुमच्या गुंतवणुकीतून येणाऱ्या परताव्यावर लागणार कर. ईएलएसएस म्युच्युअल फंडातुन तुमच्या होणाऱ्या उत्पन्नातुन जात तुम्ही पैसे काढणार असाल तर पहिल्या १ लाखांपर्यंतच्या रकमेवर कुठलाही कर लागत नाही. पण , तुम्ही काढत असलेली रक्कम जर १ लाखांपेक्षा जास्त असेल तर १ लाखांवरील उर्वरित रकमेवर मात्र तुम्हाला तुमच्या tax slab नुसार कर भरावा लागेल.

ELSS मध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे का? Is Investments in ELSS Safe?

दीर्घ कालीन उद्देशांसाठी असल्यामुळे ELSS फंड्स हे लार्ग कॅप (Long Term), स्मॉल कॅप (Small Cap) आणि मिड कॅप (Mid Cap) या सर्वच प्रकारच्या स्टॉक मध्ये गुंतवणुक करतात. या तीनही लार्ग कॅप (Long Term), स्मॉल कॅप (Small Cap) आणि मिड कॅप (Mid Cap) मार्केटची जोखीम घेण्याची क्षमता जास्त असते आणि म्हणूनच तुमची risk-taking capacity पण जास्त असते. मार्केटच्या चढ-उतारांनुसार तुमच्या फंड व्हॅल्यू कमी जास्त होईल – थोडक्यात काय तर ELSS गुंतवणूक हि थोडी जोखीमयुक्त आहे.

जय तुमची जोखीम घेण्याची तयारी नसेल तर मात्र तुम्ही या गुंतवणुकीपासून दूर राहिलेलंच ठीक राहील.

ELSS मध्ये रिटर्न्स खात्रीशीर मिळतात का? Are returns in ELSS guaranteed?

धोक्याची सूचना – म्युच्युअल फंड हे बाजार जोखीमेच्या अधीन असतात. म्युच्युअल फंड मध्ये मागील परतावा भविष्यात येऊ शकतो अथवा येऊ ही शकत नाही. म्युच्युअल फंड संबंधित योजनेबद्दल कागदपत्र वाचून गुंतवणूक करावी.

म्युच्युअल फंडाशी संबंधित जाहिरातींमध्ये वरील सूचना तुम्ही नक्कीच पाहिलेली / वाचलेली असेलच.

मार्केट संबंधित गुंतवणुकीतून तुम्हांला खात्रीशीर परताव्याची हमी मिळत नाही. स्टॉक मार्केट आणि त्यासंबंधीच्या सर्व गुंतवणूक या जोखीमयुक्त आणि गुंतवणूकदारानें आपल्या स्वतःच्या जोखमीवर करायच्या असतात – त्यात नफा नि नुकसान दोन्ही होऊ शकत.

म्हणून ELSS मध्ये ही रिटर्न्स खात्रीशीर नसतात.

मागील काही वर्षाच्या परताव्याचा अभ्यास करून आपण तुम्हांला परताव्याचा अंदाज दिला जातो – हि कुठलीही शास्त्रशुद्ध पद्धती नाही. मागील रिटर्न्सवरून भविष्यात सुद्धा तुम्हांला फायदाच होईल याची काहीही शास्वती नाही. तुम्ही तुमच्या जोखीम घेण्याच्या तयारीनुसारच या योजनांमध्ये गुंतवणूक करा.

तुम्हाला जोखीम घ्यायची तयारी नसेल तर मात्र तुम्ही या गुंतवणुकीपासून लांब राहिलेलेच बरं.

म्युच्युअल फंड मध्ये निश्चित नाही, तर अपेक्षित परतावा असतो – हा नियम नेहमी लक्षात ठेवा.

ELSS मध्ये गुंतवणूक कशी करावी? How to invest in ELSS funds in Marathi?

इतर म्युच्युअल फंड योजनांप्रमाणेच तुम्हीELSS मध्ये दोन प्रकारें गुंतवणूक करू शकता.

  • Lumpsum Investment – तुम्हाला हवी तेव्हा आणि हवी तितकी रक्कम तुम्ही या योजनेत एकगठ्ठा भरू शकता.
  • सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन / SIP – प्रत्येक महिन्याला एक छोटी रक्कम ठरवून तुम्ही स्वतः किंवा ऑटो डेबिट सह तुमच्या बँकखात्यातून वळती करू शकता. म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा हा एक उत्तम मार्ग समाजाला जातो. छोट्या रकमेसह सुरवात करून तुम्ही तर्क मोठी रक्कम भविष्यासाठी जमवू शकता.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) काय आहे? आणि एक मोठी रक्कम उभी करण्यासाठी SIP तुम्हाला कशी मदत करू शकते यासाठी हा लेख नक्की वाचा.

निष्कर्ष
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम किंवा ELSS Mutual Fund योजना या दीर्घ कालीन उद्देशांसोबत, (अपेक्षित पण खात्रीलायक नाही असा)  उत्तम परतावा (long term good returns) आणि कर सवलत देतात. स्टॉक मार्केटसंबधातील गुंतवणुकीतून जोखीम स्वीकारायची तयारी असलेल्यांसाठी आणि भविष्यकालीन गरजांच्या निकडीसाठी या योजना एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. 

जोखीम घेण्याची तयारी नसलेल्या गुंतवणूकदारांनी यांपासून दूर राहिलेलेच बरं. 

पैसाआडकाच्या व्यासपीठावर केलेल्या ब्लॉगपोस्टमध्ये दिलेली माहिती हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. पैसाआडकाच्या ब्लॉगवरील माहिती वाचकांच्या माहितीसाठी, शैक्षणिक उद्देशासाठी आणि अर्थविषयक सजगता निर्माण करण्यासाठी दिलेली आहे. तरी, वाचकांनी आपल्या आर्थिक परिस्थिती आणि गरजांचा योग्य अभ्यास करून मगच स्वतःच्या गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा – आम्ही वाचकांनी केलेल्या कुठल्याही गुंतवणुकीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आमच्या Terms & Conditions वाचा.