म्युच्युअल फंड काय आहे? What is Mutual Fund in Marathi

म्युच्युअल फंडांबद्दल सध्या सगळीकडे ऐकू येत आणि बऱ्याच लोकांना त्यात गुंतवणूक करण्याची इच्छा पण होते पण म्युच्युअल फंड नक्की काय आहे याबद्दल नक्की माहिती नसल्यामुळं त्यांचा गोंधळ उडतो.

म्युच्युअल फंड काय आहे? What is Mutual Fund in Marathi

ते सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी हा लेख.

What is Mutual Fund in Marathi

तुम्ही घरात वीज वापरता का? नक्कीच आपण सर्व जण वापरतोय. पण विजेच्या वापरासाठी आपल्यापैकी किती लोकांनी स्वतःची पॉवर स्टेशन बनवली आहेत? तर कुणीच नाही? कारण – ते आपलं काम नाही. वीजनिर्मितीसाठी लागणारी व्यावसायिक कौशल्य, संसाधन आणि गुंतवणुक अश्या एक ना अनेक गोष्टी आपण प्रत्येकजण करू शकत नाही.

यासाठी आपण मदत घेतो ती वीजनिर्मिती कंपनीकडून. वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यासाठी लागणारी सर्व व्यावहारिक गुंतवणुक, कौशल्याधारित काम, व्यवस्थापनासारखी आवश्यक अशी सर्व काम करतात आणि तुम्हाला वीज घरपोच पोचवतात – यासाठी तुम्हाला त्यांना मासिक (तुमच्या वापरानुसार आलेले बिल) फी द्यावी लागते.

म्युच्युअल फंड याचं कल्पनेवरती काम करतो. आपल्यापैकी अनेकांना जी एक सामायिक समस्या असते कि योग्य गुंतवणूक कुठं करावी याचं समाधान देण्यासाठी – लोकांकडुन पैसे गोळा करून, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक पद्धतीने गुंतवणूक करून लोकांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा दिला जातो – आणि या उद्देशासाठी जो सामायिक निधी लोकांच्या गुंतवणूकीतून उभा होतो तो म्हणजे म्युच्युअल फंड.

प्रत्येकाची गुंतवणुकीची गरज हि एकसारखी नसते आणि त्याचाच विचार करून म्युच्युअल फंड सुद्धा वेगवेगळ्या वेगवेगळ्या कालावधीसाठी, जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार विविध योजना बनवतात. या योजना गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतांना आपण त्यामध्ये गुंतवणूक करू शकतो.

म्युच्युअल फंड काम कसे करतात? How does Mutual Fund Works?

म्युच्यअल फंड प्रामुख्याने शेअर बाजारातील स्टॉक (mutual funds invests in stocks) किंवा त्यासंबंधित इतर साधनांमध्ये(stocks related instruments) गुंतवणूक करतात. जर फंड योजना असेल debt mutual scheme तर मात्र पैसे सरकारी कॉर्पोरेट बॉण्ड (Corporate Bonds), कॅश (Cash loan), ट्रेजरी बिल्स (Treasury Bills), कमर्शिअल पेपर्स (Commercial Papers – CP) मध्ये गुंतवले जातात.

आधीच सांगितल्या प्रमाणे म्युच्युअल फंड आपला पैसा समभागांमध्ये गुंतवतो. गुंतवणुकीसाठी योग्य परतावा देऊ शकतील असे समभाग शोधून काढण्यासाठी फंडांची स्वतःची आर्थिक तज्ञांची टीम कार्यरत असते. बाजारात घडणाऱ्या अनेक गोष्टी, कंपन्यांची आर्थिक स्थितीच योग्य आकलन करून त्यात गुंतवणूक करावी/ठेवावी कि नाही हे ठरवते – जेणेकरून कुठल्या कारणानं तुमची गुंतवणूक धोक्यात येणार नाही.

हि सर्व काम करण्यासाठी म्युच्युअल फंडाचा स्वतःचा असा काही खर्च (operating expenses) असतो आणि तो भागवण्यासाठी तुमच्या कडून काही फी (entry load) घेतली जात होती पण आता सेबीच्या नवीन अध्यादेशानुसार तुम्हाला नवीन गुंतवणुकीवर कुठलीही (entry load) एन्ट्री लोड लागत नाही. हो, फंडातून पैसे काढण्यासाठी मात्र तुम्हांला exit load द्यावा लागू शकतो. Exit load म्हणजे ठरावीक वेळेत जर तुम्ही तुमची गुंतवणूक काढून घेतली तर लागणारी फी. – redeem करताना exit load कापून तुम्हांला उर्वरित रक्कम दिली जाते.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी? How to Invest in Mutual Funds in Marathi

तुम्हाला म्युच्युअल फंदात पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्या समोर दोन पर्याय उपलब्ध आहेत एकरकमी गुंतवणूक (Lumpsum) किंवा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan / SIP).

  • एकरकमी गुंतवणूक (Lumpsum) – तुमच्या कडे साठवलेले पैसे असतील तर तुम्ही एकरकमी पैसे गुंतवू शकता.
  • सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan / SIP) – तुम्हांला एकरकमी पैसे गुंतवायचे नसतील तर एक ठरविलं रक्कम दर महिन्याला तुम्ही गुंतवू शकता. म्युच्युअल फंदात पैसे गुंतवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग समजला जातो. यामुळं तुम्ही ऍव्हरेजिंगचा उद्देश सध्या करू शकता तसेच बाजारात होणाऱ्या रोजच्या उपथापालथीपासून तुम्हाला थोडं संरक्षण सुद्धा मिळते.

सिप (SIP) तुम्हाला दरमहा केलेल्या शिस्तबद्ध गुंतवणुकीतून दीर्घ काळात एक मोठी रक्कम जमा करून देते. सिप (SIP) कसे काम करते यासाठी तुम्ही हे SIP Calculator on MoneyControl नजरेखालून नक्की घाला.

म्युच्युअल फंड किंवा शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह डिस्काउंट ब्रोकर झेरोधा मध्ये अकाउंट बनवा. 
म्युच्युअल फंड किती प्रकारचे आहेत? Types of Mutual Funds in Marathi
म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे फायदे Benefits of Investment in Mutual Funds in Marathi

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे काही ठळक फायदे आहेत, चला थोडक्यात माहिती घेऊया.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन | Expert Investment Advise

म्युच्युअल फंड सामान्यतः काही शे कोटी किंवा हजारो कोटींचं भांडवल सांभाळतात आणि त्याच योग्य व्यवस्थापन करायचं म्हणजे फंड मॅनेजर सुद्धा योग्य आर्थिक समज आणि अनुभवी असणारा नेमला जातो, ज्याच्या हाताखाली अर्थ विषयक जाणकारांची मोठी टीम आर्थिक विश्वात घडणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींच योग्य आकलन करून योग्य गुंतवणुकीचे निर्णय घेत असते. जेणेकरून तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील, ती उत्तरोत्तर चांगला परतावा देत राहील.

वैविध्यता | Investment Diversification

गुंतवणुकीचा एक नियम असा हे कि त्यात वैविध्य(investment must have diversification) असावं. फक्त एकाच गोष्टींमध्ये गुंतवणूक केली असल्यास त्यात जर नुकसान झाले तर तुम्ही सर्व पैसे धोक्यात येऊ शकते. याच गोष्टीचा विचार करून म्युच्युअल फंड्स आपली गुंतवणूक धोक्याची पातळी कमी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या instruments पैसे टाकतात. म्हणजे एक instrument जरी कमी परतावा देत असेल तर दुसऱ्या instrument वापरातून समतोल साधला जाईल.

योग्य परतावा | Good Returns (in long run)

म्युच्युअल फंड हे साधारणपणें दीर्घ कालीन उद्देशांसाठी वापरले जातात आणि आतापर्यंतचा फंड परतावा पाहिल्यास त्यांनी अपेक्षेपेक्षा चांगला परतावा दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मिळवून दिलेला आहे. फंड्स हे शेअरमार्केट संबंधित गुंतवणूक आहे त्यामुळे तुम्हाला निश्चित किंवा आश्वासित परतावा(no guaranteed returns) सांगितलं जात नाही पण आधीच्या परताव्याचा अभ्यास करून अंदाजित परतावा (predicted returns) गृहीत धरला जातो – यामध्ये असणारी गुंतवणुकीची जोखीम सर्वतः गुंतवणूदारांवर असतें. आपण आपल्याला झालेल्या नफा-नुकसानीसाठी कुणाला जबाबदार ठरवू शकत नाही.

तरलता | Fund Liquidity

दीर्घकाळासाठी असलेल्या कुठल्याही गुंतवणूक योजनेमध्ये तुम्हाला ठराविक काळासाठी लॉक इन दिलेला असतो – म्हणजे त्या ठराविक वेळेत तुम्ही तुमची गुंतवणूक कुठल्याही कारणांसाठी काढू शकत नाही त्याला अपवाद फक्त गुंतवणूकदाराचा झालेला मृत्यू. मग वर्षानुवर्षे आपले पैसे अडकून राहू शकतात आणि निकडीच्या वेळेस तुम्हाला आर्थिक गरजांसाठी दुसरी काही तजवीक करावी लागू शकते.

म्युच्युअल फंड गुंतवणूक असल्यानं एक फायदा होतो तो तुम्हांला कुठलाही लॉक इन नसतो याला अपवाद फक्त इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीमचा. मध्ये तुम्ही तुम्ही गुंतवणूक कधीही काढू शकता. फंदात मात्र तुम्हांला गुंतवणुकीच्या दिवसापासून पुढील ३ वर्षांचा लॉक इन पाळावा लागतो. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम किंवा ELSS म्युच्युअल फंड बद्दल अधिक माहितीसाठी हा लेख नक्की वाचा.

पैसाआडकाच्या व्यासपीठावर केलेल्या ब्लॉगपोस्टमध्ये दिलेली माहिती हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. पैसाआडकाच्या ब्लॉगवरील माहिती वाचकांच्या माहितीसाठी, शैक्षणिक उद्देशासाठी आणि अर्थविषयक सजगता निर्माण करण्यासाठी दिलेली आहे. तरी, वाचकांनी आपल्या आर्थिक परिस्थिती आणि गरजांचा योग्य अभ्यास करून मगच स्वतःच्या गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा – आम्ही वाचकांनी केलेल्या कुठल्याही गुंतवणुकीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आमच्या Terms & Conditions वाचा.