Power Of Compounding in Marathi
“एक हजार मैलांचा प्रवास एका पाउलांपासून सुरू होतो” या प्रसिद्ध चिनी म्हणीचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीने आपले ध्येय गाठण्यासाठी आपला प्रवास सुरू केला पाहिजे आणि हे तत्व गुंतवणुकीसाठी अगदी चपलख बसते.
गुंतवणुकीची कुठलीही योग्य वेळ नसते. तुम्ही तुमच्या आर्थिक आयुष्याच्या सुरवातीला किंवा अगदी कधीही गुंतवणूक सुरु करू शकता. काही कारणास्तव जर तुम्हांला गुंतवणूक करण्यासाठी उशीर झाला असेल तरी त्यामुळं फार्स काही बिघडतं नाही – तुम्ही तेव्हा सुरवात करावी हे महत्वाचं. इंटरनेटचा वापर वाढल्यापासुन आपल्या हाती माहितीचा खजिना आलाय आणि त्यातून अनेकांचं आर्थिक बाबींविषयी असलेली सजगता आणि आर्थिक साक्षरता वाढतेय हि एक चांगली बाब आहे.
आजकाल प्रत्येकाला पद्धतशीर आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीचे महत्त्व समजले आहे. शिस्तबद्ध गुंतवणुकीचा मुख्य फायदा हा आहे की, तुम्ही छोट्या गुंतवणुकीच्या रकमेपासून सुद्धा सुरुवात करू शकता आणि जितक्या जास्त वेळ तुम्ही गुंतवणुक राखून ठेवलं तितक्या वेळेत तुम्हाला चक्रवाढीचा परिणाम दिसेल आणि तुमचा संपत्ती वेगाने वाढेल. परंतु आपल्यापैकी अनेकांना या चक्रवाढ पद्धतीने वाढणाऱ्या संपत्तीच्या वेगाची शक्ती माहित नाही.
पॉवर ऑफ कंपाउंडिंग म्हणजे काय? पॉवर ऑफ कंपाउंडिंगचे संपूर्ण फायदे पाहण्यासाठी आपण कोणते नियम पाळले पाहिजेत हे आपण या पोस्टमध्ये पाहू.
पॉवर ऑफ कंपाउंडिंग म्हणजे काय What is the Power Of Compounding in Marathi
अगदी गणितीयदृष्ट्या व्याख्या करायची असल्यास चक्रवाढीची व्याख्या – ‘मुद्दलावर मिळालेल्या व्याजामुळे, तसेच जमा झालेल्या व्याजामुळे गुंतवणुकीच्या मूल्यात झालेली वाढ.‘ अशी करता येईल.
चक्रवाढ व्याज (Compound Interest) हा जगातील आठवा चमत्कार आहे. ज्याला हा चमत्कार समजतो, तो पैसे कमावतो… ज्याला समजत नाही … तो पैसे गमावतो.
अल्बर्ट आईनस्टाइन
सोप्या भाषेत सांगायचे तर, ही एक धोरण आहे ज्यानुसार तुमचा पैसे तुमच्या साठी काम करतो. तुमची संपत्ती जलद गतीने वाढवण्यासाठी हे एक शक्तिशाली साधन मानले जाऊ शकते. तुमची भविष्यातील उद्दिष्टे, जसे की सेवानिवृत्तीची योजना करण्यासाठी किंवा वाढत्या महागाई अनुरूप गुंतवणुकीवर परतावा मिळवण्यासाठी तुम्ही चक्रवाढ पद्धतीचा योग्य वापर करून घेऊ शकता.
साधे व्याज म्हणजे तुम्ही तुमच्या मुद्दलावर व्याज मिळवता. परंतु चक्रवाढ व्याजासह, तुम्हाला मूळ रकमेवर तसेच सलग कालावधीत जमा झालेल्या व्याजाच्या रकमेवर व्याज मिळते – तुम्ही तुमची गुंतवणूक जितकी जास्त वर्षे राखलं तितक्या वर्षांत हे चक्र सुरु राहील आणि तुमच्या मूळ मुद्दलात व्याजाची आणि त्या व्याजावर जमा होणाऱ्या दुसऱ्या व्याजाची भक्कम भर पडेल – आणि याचा परिणाम तुमची एकूण गुंतवणुक चक्रवाढ पद्धतीने वाढण्यात होईल.
तथापि, पॉवर ऑफ कंपाउंडिंगचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीत काही शिस्त पाळली पाहिजे. एकतर म्युच्युअल फंडातील एसआयपी किंवा निवडक स्टॉक्समधील एसईपी, यांशिवाय सरकारी योजना पी.पी.एफ. किंवा सुकन्या समृद्धी योजना या चक्रवाढ पद्धतीने उत्कृष्ट परतावा देण्यासाठी ओळखल्या जातात.
गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाचा नफा मिळवण्यासाठीचे ४ नियम (4 Rules to earn better with Power Of Compounding in Marathi)
व्याजावर चढणार व्याज आणि त्यातून होणारी मुद्दलात वाढ हे चक्रवाढ व्याज हे साध्या व्याजापेक्षा चांगले असले तरी, चक्रवाढीची शक्ती वापरण्यासाठी तुम्ही काही मुद्दे लक्षात ठेवावेत. पॉवर ऑफ कंपाउंडिंगचे संपूर्ण फायदे पाहण्यासाठी तुम्ही या नियमांचे पालन केले तर तुम्ही त्याचा योग्य फायदा उठवू शकाल –
१. गुंतवणुकीला लवकर सुरवात करा (Start Investment Early Age)
पॉवर ऑफ कंपाउंडिंगचे फायदे पाहण्यासाठी हा सर्वात महत्वाचा आणि प्राथमिक नियम आहे. तुमच्या गुंतवणुकीला लवकर सुरुवात करा, जेणेकरून तुमच्याकडे गुंतवणुकीचे वेळ जास्त असेल. कमी वयात गुंतवणूक सुरवात केल्यामुळं तुमच्या उतारवयापर्यंतचा एक मोठा काळ तुम्ही तुच्या मुद्दलावर, त्यावर मुळणाऱ्या व्याजावर आणि हि रक्कम पुनर्गुंतवणूक करून एक मोठी रक्कम संपत्ती म्हणुन निर्माण करू शकाल.
२. दीर्घकालीन गुंतवणूक (Plan long-term Investment Horizon)
दीर्घ कालीन उद्देशांसाठी गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांत सातत्य आणि शिस्त फार महत्वाची आहे. कंपाउंडिंगची शक्ती पाहण्यासाठी दीर्घ कालावधीसाठी नियमित बचतीची आवड आणि त्या बचतीची नियमित गुंतवणूतिची शिस्त अत्यंत आवश्यक आहे. कीटक जास्त वेळ तुम्ही गुंतवणूकीत राहाल तुमचा परतावा तितक्या पटीत वाढेल.
३. गुंतवा आणि विसरा (Invest and Forget)
दीर्घकालीन उद्देशांसाठी पैसे बनवायला पॉवर ऑफ कंपाउंडिंग तुम्हाला मदत करते पण या उद्देशांसाठी केलेलय गुंतवणुकीत टाकलेला पैसे तुम्ही त्यानंतर तुमचे लक्ष गाठेपर्यंत काढू नयेत. याचा अर्थ असा नाही कि आपण ती गुंतवणूक सर्वथा विसरायला पाहिले – नियमितपणे आपल्याला त्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवावे लागेल, वर्षातून एकदा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करावा लागेल, फायनान्शियल प्लॅनरच्या सूचनेनुसार तुमचा पोर्टफोलिओ री-शफल करू शकता आणि कॉर्पस नवीन पोर्टफोलिओमध्ये टाकू शकता. जर विद्यमान पोर्टफोलिओ चांगली कामगिरी करत असेल, तर री-शफलिंगच्या पुढील शेड्यूलपर्यंत हा पोर्टफोलिओ व्यत्यय आणू नका.
४. सातत्य ठेवा (Stay invested)
दीर्घ उद्देशांसाठी गुंतवणूक करताना सातत्य फार गरजेचं आहे. रोजच्या होणाऱ्या घटनांनी जर मार्केट खाली-वर होत असेल आणि त्यामुळं तुमचा सयंम सुटत असेल तर ते स्वाभाविक आहे पण यामुळं तुम्हांला चक्रवाढ पद्धतीने होणाऱ्या फायद्यांना मुकावं लागेल. अश्या घटनांनी होणाऱ्या मार्केटमधील चढ-उतारांवर थोड्या संयमानं घेऊन जर तुम्ही गुंतवणूक वाचवू शकाल तर तुमची छानसं कॉर्पस बनवू शकाल.
कंपाउंडिंग पॉवरबद्दल लक्षात ठेवण्याचे मुद्दे:
- समजा, जेव्हा तुम्ही 100 रुपये वाचवता आणि 10% वार्षिक व्याज मिळवता, तेव्हा तुमच्याकडे एका वर्षाच्या शेवटी 110 रुपये असतील. पुढील वर्षी चक्रवाढ केल्यामुळे तुम्हाला रु. 110 वर 10% व्याज मिळेल, जे तुम्हाला रु. 121 वर सोडेल. पुढच्या वर्षी रु. 121 वर 10% व्याज मोजले जाईल आणि असेच पुढे. कालांतराने, ही बचत झपाट्याने वाढेल.
- काही संख्या नियम आहेत जे गणनेसाठी जलद पद्धती शोधण्यासाठी विकसित केले गेले आहेत, विशेषतः वित्त. नियम 72, तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी किती वेळ लागेल याची गणना करण्याची अशीच एक द्रुत पद्धत आहे. तर, जर तुम्ही 100 रुपये वार्षिक 10% चक्रवाढ व्याजासह गुंतवले तर, 72 चा नियम 72/10 = 7.2 वर्षे गुंतवणुकीसाठी 200 रुपये होण्यासाठी लागणारा अंदाजे कालावधी देतो.
चक्रवाढ ही एक शक्तिशाली गुंतवणूक जादू आहे. पॉवर ऑफ कंपाउंडिंगसह, जास्त काळासाठी थोडेसे पैसे मोठ्या रकमेत वाढू शकतात. कमावलेल्या, परंतु खर्च न केलेल्या परताव्याद्वारे हे साध्य केले जाते. जेव्हा परतावा पुन्हा गुंतवला जातो, तेव्हा तुम्हाला परताव्यावर परतावा आणि त्या परताव्यावर परतावा मिळतो आणि असेच. त्यामुळे चक्रवाढ परताव्याच्या सामर्थ्याचा फायदा घेण्यासाठी लवकर बचत सुरू करणे महत्त्वाचे आहे.
पॉवर ऑफ कंपाउंडिंग कसे काम करते हे पाहण्यासाठी तुम्ही चे HDFC ऑनलाईन कॅल्कुलेटर अजमावून पहा.