सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign Gold Bonds Scheme in Marathi)

आपण भारतीयांचं सोनं या धातूंबद्दल असलेले आकर्षण प्राचीन काळापासून जगात प्रसिध्द आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (World Gold Council) रिपोर्टनुसार भारतीयांकडे (household gold) जवळपास २५,००० टन इतकं सोनं आहे जे जगातल्या इतर कुठल्याही देशांतल्या प्रमाणपेक्षा जास्त आहे.

पारंपरिक काळापासून सोन्याकडे आपण सुरक्षित आणि भरवशाची गुंतवणूक म्हणून पाहतो आणि ते या विश्वासावर खरं सुद्धा उतरलेलं आहे. भारतीय कुटुंबांकडे असणारे सोने जास्तकरून दागिने किंवा तुकडा स्वरूपात घेतलं जात आणिकठीण काळामध्ये कामा येईल तोपर्यत ते सांभाळले सुद्धा जातं- – आपण भारतीयांचा कल सोनं म्हणजे एक गुंतवणुक म्हणुन थोडा कमीच आहे पण सध्या हे चित्र बदलत असल्याचं दिसते.

सोन्यात आपण भावनिक जास्त आणि आर्थिक (उपधालीच्या दृष्टीनें) कमी गुंतवणूक करीत असतो. त्यात सुरक्षितता हा घटक जास्त महत्वाचा आणि खात्रीलायक परतावा आणि अडीअडचणीच्या वेळेला हातचा पर्याय या दोन गोष्टींचा मुख्य उद्देश असतो. यांत आर्थिक आघाडीवर जरी मोठी जोखीम नसली तरी भौतिक स्वरूपांत असणारं सोनं सांभाळणं (physical gold) किंवा सुरक्षित ठेवणं हे एक मोठं जिकीरीचं काम आहे, तसेच सोन मोडताना लागणारी घट, मजुरीचा खर्च असे काही इतर गोष्टींमुळं थोडंफार जास्त पैसे आपण गमावू शकतो अशी वास्तवीक परिस्थिती आहे.

सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign Gold Bonds Scheme in Marathi)

गुंतवणूकदारांना सोन्यामध्ये गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित आणि डिजिटल पर्याय देण्यासाठी भारत सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (SGB) योजना सुरू केली. सोन्याच्या या स्वरूपात केलेली गुंतवणूक आपल्याला भौतिक पद्धतीनं सोनं हाती येत नाही त्यामुळं ते सांभाळण्याचं दायीत्व आपल्यावर नाही पण आपण गुंतवणूक केलेल्या रक्कमेइतके सोनं डिजिटल स्वरूपांत आपल्याला दिले जाते. भारतीय रिजर्व बँकेतर्फे हि योजना राबवली जात असल्यामुळं ती अतिशय पारदर्शक, सुरक्षित आणि परवडणारी आहे जे निश्चित. या बाँडमधील सोने 999 शुद्धता असलेल्या कमीतकमी एक ग्रॅम युनिट अश्या आधारावर विकले जाते आणि एक ग्रॅमच्या पटीत एक ठराविक रकमेपर्यंत तुम्हाला यात गुंतवणूक करण्याची परवानगी आहे.

तुम्ही जर सोन्यामध्ये गुंतवणुकीसाठी उत्सुक असाल तर सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (SGB) योजनेचा नक्की विचार करा.

SGBs मध्ये कोणी गुंतवणूक करावी? Who can Invest in Sovereign Gold Bonds (SGB)

आपल्या पर्सनल फायनान्स प्लॅनिंगचा आणि सोन्यामध्यें गुंतवणुकीचा विचार करता आपली गुंतवणुक ५-१०% सोन्यामध्ये असावी असं तज्ञ् सुचवितात. भौतिक सोन्याच्या तुलनेत, SGBs खरेदी (बाजारभावांपेक्षा ५० रुपये कमी) किंवा विक्रीची किंमत खूपच कमी आहे, शिवाय सरकारपुरस्कृत योजना असल्यामुळं डीमॅट/इलेक्ट्रॅनिक फॉर्ममध्ये उपलब्धता, सुरक्षितता आणि शुद्धतेची हमी या जमेच्या बाजु आहेतच.

याशिवाय ज्यांना भौतिक सोने साठवण्याजोखीम नकोय नाही ते SGBs चा विचार करू शकतील कारण हे डिमॅट फॉर्ममध्ये साठवणे सोपे आहे आणि ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्याने कोणीही ते चोरू शकत नाही.

सार्वभौम गोल्ड बाँड्स योजनेची वैशिष्ट्ये थोडक्यात (Features of SGB In Marathi)

  • कुणीही भारतीय रहिवासी – व्यक्ती, ट्रस्ट, HUF, धर्मादाय संस्था आणि विद्यापीठे – SGB मध्ये गुंतवणूक करू शकतात. तुम्ही अल्पवयीन मुलांच्यावतीने कायदेशीर पालक सुद्धा गुंतवणूक करू शकता.
  • मध्ये किमान गुंतवणूक 1 ग्रॅम सोने आणि कमाल मर्यादा प्रति गुंतवणूकदार (वैयक्तिक आणि HUF) 4 किलो सोने आहे. ट्रस्ट आणि युनिव्हर्सिटी सारख्या संस्थांना 20 किलो सोने विकत घेण्याची परवानगी आहे.
  • सार्वभौम सुवर्ण रोख्यांचा परिपक्वता कालावधी आठ वर्षांचा असतो. तथापि, तुम्ही पाचव्या वर्षापासून बाँडमधून बाहेर पडणे निवडू शकता.
  • तुमच्या एकूण गुंतवणुकीवर SGB साठी सध्याचा व्याज दर 2.50% वार्षिक आहे. हे व्याज तुम्हांला वर्षातून दोनदा दिले जाते आणि व्याज करपात्र आहे.
  • केंद्र सरकारच्या वतीने फक्त RBI SGB जारी करू शकते आणि हे सर्व व्यवहार स्टॉक एक्स्चेंजवर व्यवहार केले जातात. हे एक ग्रॅम सोन्याच्या पटीत जारी केले जाते. त्यासाठी गुंतवणूकदारांना कडून होल्डिंग सर्टिफिकेट (SGB Holding Certificate) मिळते. तुम्ही डीमॅट खातेधारक असाल तर तुम्ही हे युनिट्स डिमॅट फॉर्ममध्ये (Convert SGB Holding in D-mat) देखील बदलून घेऊ शकता.
  • काही बँका डीमॅट फॉर्ममध्ये तारण ठेवलेल्या कर्जांवरील तारण/सुरक्षा म्हणून SGB स्वीकारतात. त्यामुळे, सोन्याच्या मूल्याशी लोन-टू-व्हॅल्यू (LTV) गुणोत्तर सेट केल्यानंतर ते ते सोने कर्ज म्हणून मानतील.

या लेखांत पुरवलेली माहिती हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. हि माहिती वाचकांच्या उपयोगासाठी, शैक्षणिक उद्देशासाठी आणि अर्थविषयक सजगता निर्मान करण्यासाठी दिलेली आहे. तरी, वाचकांनी आपल्या आर्थिक परिस्थिती आणि गरजांचा योग्य अभ्यास करून मगच स्वतःच्या गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा – आम्ही वाचकांनी केलेल्या कुठल्याही गुंतवणुकीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आमच्या Terms & Conditions वाचा.