सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign Gold Bonds Scheme in Marathi)

गुंतवणूकदारांना सोन्यामध्ये गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित आणि डिजिटल पर्याय देण्यासाठी भारत सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (SGB) योजना सुरू केली. सोन्याच्या या स्वरूपात केलेली गुंतवणूक आपल्याला भौतिक पद्धतीनं सोनं हाती येत नाही त्यामुळं ते सांभाळण्याचं दायीत्व आपल्यावर नाही पण आपण गुंतवणूक केलेल्या रक्कमेइतके सोनं डिजिटल स्वरूपांत आपल्याला दिले जाते.