कुठल्याही फायनान्स कंपनीला कर्ज किंवा क्रेडिट कार्डासारखे आगाऊ पैसे खर्च करू देण्याची सोय कुणाला द्यायची असेल तर त्या व्यक्तिची ते आगाऊ वापरलेले पैसे परत करण्याची क्षमता आणि पात्रता जाणून घ्यायला संबंधित व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) किंवा सिबिल रिपोर्ट (CIBIL Score) मदत करतो.
सिबिल काय आहे? Cibil Score in Marathi
रिजर्व बँक ऑफ इंडिया तर्फे परवाना प्राप्त Credit Information Bureau (India) Limited (CIBIL) एक क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी आहे.
सिबिलतर्फे दिला जाणारा क्रेडिट स्कोर हा तुमच्या क्रेडिट हिस्टरीनुसार ३०० ते ९०० या आकड्यांमध्ये असतो. तुमचा क्रेडिट स्कोर जितका मोठा तितका तुम्ही आर्थिकबाबींसाठी विश्वसनीय ठराल. आर्थिक सेवा घेण्यासाठी तुमचा प्राधान्यानं विचार केला जाईल.
७५० इतका सिबिल स्कोअर हा चांगला असल्याचं मानलं जातं आणि वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी पात्र ठरवण्यास आपली मदत करतो. जर आपला सिबिल स्कोअर ७५० पेक्षा कमी असेल तर आपल्याला बँका किंवा एनबीएफसी यांच्याकडून कर्ज घेण्यास अडचणी येतात. तुम्ही कर्ज घेत असताना बँका किंवा वित्तीय संस्था तुमचा सिबिल स्कोअर आधी तपासतात.
जर तुम्ही एखादं कर्ज घेतलं असेल किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला असेल तर त्याचा हफ्ता वेळेवर भरा. वेळेवर हफ्ता भरल्यास तुमचा सिबिल स्कोअर सुधारण्यास मदत होते.
सिबिल स्कोर म्हणजे काय? What is Cibil Score In Marathi
एकरकमी मोठी गुंतवणूक लागणाऱ्या खर्चांसाठी रक्कम उभी करणे मध्यमवर्गाची नेहमीच थोडं अवघड असते आणि त्यासाठी एक सोपा उपाय म्हणून आपण गरजेनुसार कर्ज किंवा क्रेडिट कार्डांचा वापर करतो.
हे दोन्ही उपाय जर योग्य कारणांसाठी वापरले तर नक्कीच तुमची नड भागवू शकतात पण अविचाराने यांचा केलेला उपयोग मात्र तुम्हाला आर्थिक सांकटामध्ये टाकल्याशिवाय राहत नाही हे वास्तव आहे.
आपल्याला कुठल्याही गरजांसाठी पैसे पुरवणाऱ्या बँक किंवा नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (Non-Banking Financial Companies – NBFC) तुमच्यावर विश्वास ठेऊन आगाऊ पैसे पुरवण्याची रिस्क घेतात ती कशी काय? त्यांना तुम्ही पैसे परत करू शकाल याची खात्री काही असते?
या सर्व गोष्टींसाठी त्यांना तुमच्याबद्दल अस्वस्थ करण्याचं काम करतो तुमचा सिबील स्कोर आणि क्रेडिट रिपोर्ट.
तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर माहिती नसेल तर तुम्ही तो फ्री सिबिल स्कोर मराठी (Get your Cibil Score for Free) बघू शकता.
आणि हाच सिबिल स्कोर म्हणजे नक्की काय ते आपण या लेखात बघणार आहोत.
क्रेडिट स्कोर किंवा क्रेडिट रिपोर्ट हा प्रत्येक कर्ज प्रकरण करताना बँकेकडून तपासला जातो. जर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हांला कर्ज मंजूर होण्याची शक्यता चांगली असते कदाचित तुम्हाला व्याजामध्ये थोडी सूट सुद्धा मिळून शकेल. पॅट, तुमचा क्रेडिट स्कोर जर चांगला नसेल तर तुम्हाला दिलेले पैसे कदाचित योग्य वेळी तुम्ही परत करू शकणार नाही असा अर्थ घेऊन बँक तुम्हांला कर्ज देण्यास नकार देऊ शकतात.
सिबिल स्कोर मध्ये सुधारणा कशी करावी? How to improve your Cibil Score?
तुमचा सध्याचा सिबिल स्कोर जर कमी असेल तर अनेक आर्थिक सुविधा मिळवण्यासाठी तुम्हांला अडचणीचं ठरू शकत पण तुमचा क्रेडिट स्कोर मध्ये सुधारणा करणे काही फार मोठी गोष्ट नाहीये – तुम्हांला फक्य थोड्य आर्थिक शिस्तीची आवश्यकता आहे.
तुमचा क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी तुम्ही या गोष्टींपासून सुरवात करू शकता –
- चांगला सिबिल स्कोअर ठेवण्यासाठी वेळेवर कर्जाचे किंवा क्रेडिट कार्डचे हफ्ते भरा. उशीरा पेमेंट टाळा. अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होतो.
- तुम्ही तुमच्या क्रेडिट लिमिट पेक्षा जास्त खर्च करणार नाही याची काळजी घ्या. मर्यादेपेक्षा जास्त खर्च करणे हा तुमचा आर्थिक बाबीवरील निष्काळजीपणा दर्शवते.
- आपल्या क्रेडिट रिपोर्ट नेहमी तपासात राहा. काही कारणांमुळे त्यात काही चुकी असल्यास ती तात्काळ बरोबर करून घेण्याला प्राधान्य द्या.
या लेखांत पुरवलेली माहिती हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. हि माहिती वाचकांच्या उपयोगासाठी, शैक्षणिक उद्देशासाठी आणि अर्थविषयक सजगता निर्मान करण्यासाठी दिलेली आहे. तरी, वाचकांनी आपल्या आर्थिक परिस्थिती आणि गरजांचा योग्य अभ्यास करून मगच स्वतःच्या गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा – आम्ही वाचकांनी केलेल्या कुठल्याही गुंतवणुकीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आमच्या Terms & Conditions वाचा.