नवीन ग्राहक नाही जोडू शकणार Paytm पेमेंट बँक (Restrictions on Paytm Payment Bank)

paytm-payment-bank-restrictions

पेटीएम पेमेंट बँकेकडे सध्या ६ कोटी सेविंग्स अकाउंट आहेत आणि त्याचसोबत जवळपास ३० कोटींपेक्षा जास्त Paytm Digital Wallets आहेत. गेली डिसेंबर महिन्यास संपलेल्या तिमाहीमध्ये पेटीएम तर्फे जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्यांनी 92.6 कोटींपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन्स प्रोसेस केली आहेत आणि हि संख्या खरंच प्रचंड आहे. इतक्या मोठ्या प्रमाणांत ऑपरेशन्स असणाऱ्या कुठल्याही आर्थिक आस्थापनावर ग्राहकांच्या हिताची काळजी घेण्याची जबाबदारी फार मोठी असते.