नवीन ग्राहक नाही जोडू शकणार Paytm पेमेंट बँक (Restrictions on Paytm Payment Bank)

शुक्रवारी दिनांक ११ मार्च रोजी रिजर्व बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँकेवर कार्यपद्धतीमध्ये सुधारणा आणण्यासाठी काही निर्बंधांची घोषणा केलेली असून पेटीएम पेमेंट बँकेला नवीन ग्राहक जोडण्यावर मनाई केलेली आहे. तुमचा सध्या पेटीएम पेमेंट बँकेत खाते असेल तर मात्र तुम्ही ते नेहमीसारखं वापरू शकणार आहात.

पेटीएम पेमेंट बँकेवर निर्बंध का? Why restrictions on Paytm Payment Bank

पेटीएम पेमेंट बँकेकडे सध्या ६ कोटी सेविंग्स अकाउंट आहेत आणि त्याचसोबत जवळपास ३० कोटींपेक्षा जास्त Paytm Digital Wallets आहेत. गेली डिसेंबर महिन्यास संपलेल्या तिमाहीमध्ये पेटीएम तर्फे जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्यांनी 92.6 कोटींपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन्स प्रोसेस केली आहेत आणि हि संख्या खरंच प्रचंड आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणांत ऑपरेशन्स असणाऱ्या कुठल्याही आर्थिक आस्थापनावर ग्राहकांच्या हिताची काळजी घेण्याची जबाबदारी फार मोठी असते आणि त्याच अनुषंगाने बँकिंग नियमन X, 1949 च्या कलम 35A अंतर्गत ही कारवाई करत रिजर्व बँके ऑफ इंडियाने पेटीएमला तसेच comprehensive System Audit ऑडिट फर्म नियुक्त करण्यास सांगितले आहे.

आयटी ऑडिटर्सचे अहवाल पाहिल्यानंतर पेटीएमला नवीन ग्राहक जोडण्याची परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय आरबीआय घेईल.

पेमेंट बँक म्हणजे नक्की काय? What is Payment Banks in Marathi
Restrictions on Paytm Payment Bank

पेमेंट बँक आपल्या इतर बँकेपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने काम करते. २०१६ मध्ये डॉ. नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली केल्या गेलेल्या पाहणीअहवालानुसार “लहान उद्यमी किंवा किंवा कमी उत्पन्न असलेल्या गटांना” डिजिटल बँकिंग प्रणालीमध्ये आणण्यासाठी स्थापन केलेल्या कमिटी तर्फे “पेमेंट बँकेची” संकल्पना प्रथम सुचवली गेली.

तळागाळातील या घटकांपर्यंत पोचण्यासाठी रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली भारत सरकारनें अनेक खाजगी उद्योगांना पेमेंट बँक स्थापनेला मंजुरी दिली.

Paytm Payment Bank सुविधा काय आहेत? Benefits you get with Paytm Payment Banks

झेरॉ बॅलन्स बचत खाते आणि त्याला संलग्न असणारे वर्चुअल डेबिट कार्ड. तुम्हाला आवश्यकता असल्यास तुम्ही काही फी भरून रेगुलर डेबिट कार्ड सुद्धा मागवू शकता.

  • 0 बॅलन्स बचत खाते / Zero Balance Savings Account
  • डिजिटल पासबुक / Paytm Payment Bank Digital Passbook
  • वर्चुअल डेबिट कार्ड / Debit Card
  • कुठलेही अकाउंट फी आणि चार्जेस नाहीत / No account & fee changes
  • स्पेंड एनालिटिक्स
  • बिल पेमेंट / Bill Payments with Paytm Payment Bank
  • फिक्स्ड डिपॉजिट / Paytm Fixed Deposits
  • मनी ट्रांसफर / Paytm Money Transfer

या लेखांत पुरवलेली माहिती हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. हि माहिती वाचकांच्या उपयोगासाठी, शैक्षणिक उद्देशासाठी आणि अर्थविषयक सजगता निर्मान करण्यासाठी दिलेली आहे. तरी, वाचकांनी आपल्या आर्थिक परिस्थिती आणि गरजांचा योग्य अभ्यास करून मगच स्वतःच्या गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा – आम्ही वाचकांनी केलेल्या कुठल्याही गुंतवणुकीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आमच्या Terms & Conditions वाचा.