पैसा कमावणं सोपं नाही पण त्याहून काही कठीण असेल तर तो सांभाळणं किंवा त्याची योग्य हाताळणी करणं.
आपापल्या नोकरी किंवा व्यवसायात स्थिर असलेली आणि चांगलं उत्पन्न मिळवीत असलेली उच्चशिक्षित लोक सुद्धा काही वेळेला चुकीचे निर्णय घेऊन आपला मेहनतीनं कमावलेला पैसे चुकीच्या ठिकाणी खर्च/गुंतवणूक करून बसतात.
पर्सनल फायनान्सचा विचार करीत असतांना तुमच्या नियमित उत्पन्नातून गरजेचे खर्च वजा केल्यानंतर उरणाऱ्या रकमेतून बचत कशी करावी किंवा गुंतवणुक करावी तर कुठं हा प्रश्न अनेकांना भेडसावतो.
बचत आणि गुंतवणुक दोन्ही महत्वाच्या आणि पूर्णतः वेगळ्या गोष्टी आहेत – आणि यामध्ये अजूनही अनेकांची गल्लत होते. आपण आपल्या उत्पन्नातून काही भाग बचत केला तर तो आपल्यासाठी गुंतवणुक आहे हि एक चुकीची समजून आहे.
बचत आणि गुंतवणुकीतला फरक समजायचं असेल तर तो आपण मुख्यतः जोखीम घेण्याची क्षमता आणि परताव्याची क्षमता या दोन गोष्टींवर पाहू शकतो.
तुम्ही केलेल्या बचतीवर तुम्ही शून्य जोखमी सोबत अगदीच (जवळपास नाही असा) थोडा परतावा मिळवू शकता. बचत म्हणून फक्त सांभाळलेला पैसा हा महागाईचा विचार करीत असता दिवसागणिक आपलं मूल्य कमी करीत असतो.
याउलट, योग्य गुंतवणुक हि कमी किंवा अधिक जोखमीचं असू शकेल पण तुम्ही केलेली योग्य गुंतवणूक तुम्हाला तुमचा पैसा वाढण्यासाठी मदत करते. गुंतवणूक करीत असतांना तुम्ही तुमच्या सध्याचा उत्पन्नाची, आवश्यक गरजांची, भविष्यात येणाऱ्या नवनवीन जबाबदाऱ्यांबद्दल योग्य अभ्यास करून गुंतवणुकीची निवड केली तर तुम्ही नक्कीच चलनवाढीच्या दरापेक्षा जास्त परतावा मिळवू शकता.
बचत करण्यासाठी सर्वात जास्त मुदत ठेवींचा वापर केला जातो. मुदत ठेवी या सुरक्षीत आहेत आणी त्यांना एका मर्यादेपर्यंत विमा सरंक्षण सुद्धा मिळते.
बँक मुदत ठेवी (Bank Fixed Deposits)
कमी जोखीम घेऊन पैसा बचत करण्याचा हा सर्वांत सोपा उपाय आहे. मुदतठेव सुरु करण्याची सोय आपल्याला बँकेत, पोस्ट ऑफिसमध्ये आणि काही खाजगी कंपनीद्वारे सुद्धा आहे.
मुदतठेवी या शेअर बाजाराशी संबंधित नसतात म्हणून यातून येणारे व्याज हे त्या मानाने कमी आणि गुंतवणुकीवर असलेली जोखीम जवळपास नसतेच.
बँकेत केलेली मुदतठेव हि संपुर्ण सुरक्षित असते का?
आपण किती रकमेची मुदत ठेव करू शकतो याला नियमानुसार तशी मर्यादा नाही. सगळ्या बँक या भारतीय रिजर्व बँकेशी संलग्न असतात आणि Deposit Insurance And Credit Guarantee Corporation नुसार रिजर्व बँक ऑफ इंडिया आपल्या मुदत ठेवींसाठी विमा सुविधा देत असते. सध्याच्या नियमानुसार बँकेत ग्रहण असलेल्या प्रत्येक ग्राहकांसाठी ५ लाखांपर्यंत मुदत ठेवींवर संरक्षण देते.
बँकेतर्फे आधीच निर्धारित केलेल्या मुदतीसाठी आपण आपले पैसे मुदत ठेवीत गुंतवतो आणि त्यावर ठराविक व्याज घेतो असं हे साधं सरळ गणित आहे. जेष्ठ नागरिकांसाठी व्याजाचा दर हा साधारणपणे थोडा जास्त असतो. सरकारी, गैरसरकारी बँकेमध्ये व्याजाचा दर वेगवेगळा असू शकेल.
मुदतठेव या पैसे सांभाळून ठेवण्यासाठी असल्या तरी ५ वर्षांच्या मुदतीसाठी केलेल्या मुदतठेवीमधून आपण कर बचत सुद्धा करू शकतो.
मुदतठेवींचे प्रकार (Types of Fixed Deposits in Marathi)
1 . स्टॅंडर्ड टर्म डिपॉजिट (Standard Term Deposit) – ७ दिवस ते १० वर्षापर्यंतच्या मुदतीसाठी तुमच्या बँकेच्या सध्याच्या व्याजदरानुसार फिक्स्ड डिपॉजिट बनवता येते.
2. सिनियर सिटीझन फिक्स्ड डिपॉजिट (Senior Citizen Fixed Deposit) – बँक इतर ग्राहकांपेक्षा ६० वर्षांवरील जेष्ठ व्यक्तींना थोडं जास्त व्याज देते आणि या मिळणाऱ्या व्याजाच्या उत्पन्नावर कर कपात केली जात नाही.
3. रिकरिंग फिक्स्ड डिपॉजिट
4. कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉजिट(Corporate Fixed Deposit) – काही कोर्पोरेट संस्थांमध्ये सुद्धा मुदत ठेवी करण्याची सोय उपलब्ध आहे. बँकेपेक्षा थोड्या कोखमीसह आपल्याला मिळणारे व्याज हे बँकेपेक्षा थोडे जास्त असते. काही कारणाने जर कंपनी बुडाली तर आपल्या ठेवी फारश्या संरक्षित असणार नाहीत.
5. एन.आर.आय. फिक्स्ड डिपॉजिट (N.R.I. Fixed Deposit) – एन.आर.आय. असणाऱ्या व्यक्तींसाठी सुरक्षित पैसे ठेवण्याचाचांगला पर्याय आहे. रुपया-डॉलरच्या चढ उतारांमधून टॅक्स फ्री व्याज कमावण्यासाठी याचा वापर करता येईल.
महत्त्वपूर्ण खुलासा / Disclosure : प्रस्तुत लेखात दिलेली माहिती केवळ आर्थिक जागरूकता आणि आर्थिक साक्षरता वाढावी या उद्देशानें बनवलेली आहे. पैसाअडका कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही किंवा आम्हाला त्यात कमिशन मिळत नाही. शेअर मार्केटमध्ये किंवा इतर कुठल्याही आर्थिक गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कुठलीही गुंतवणूक हि जोखीमयुक्त असतें आणि तुमच्या गुंतवणुकीची संपूर्ण जबाबदारी हि तुमची / गुंतवणूकदाराची असेल. तुमच्या कुठल्या चुकीच्या गुंतवणुकीची जबाबदारी पैसाअडका घेत नाही. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर इतरांशी नक्की शेअर करा आणि अश्याच उपयुक्त माहितीसाठी आमच्या ब्लॉगला फॉलो करा.