पर्सनल फायनान्स प्लॅनींग करतांना इमर्जन्सी फंड बनवणे (why emergency fund) सर्वात महत्वाची आणि सर्वात आधी विचारांत घेण्याची बाब मानली जाते. कुठल्याही कारणाने का असेना जात तुमच्या नियमीत उत्पन्नात कमी आली किंवा ते थांबलं तर हा आपात्कालीन निधी तुमचं जीवन काही काळासाठी सुरळीत सुरु ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करतो आणि त्या दरम्यात तुम्ही उत्पन्नाचे इतर स्रोत सुस्थापित करू शकाल असा विचार यामागे असतो.
आणि म्हणूनच तुम्ही बाजूला काढत असलेला आपत्कालीन निधी योग्य ठिकाणी आणि कमी किंवा जोखीम नसलेल्या ठिकाणी गुंतवणं फार गरजेचं आहे – अन्यथा तुम्ही तो गमावला तर तुमचं मुळ उद्दिष्ट साधणार नाही.
लिक्विड फंड महागाईला पुरक परतावा देतात का? Does Liquid Fund beats Inflation
लिक्विड फंड हे असे डेट म्युच्युअल फंड आहेत जे निश्चित-उत्पन्न देणाऱ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात जसे की ठेव प्रमाणपत्रे, ट्रेझरी बिले, कमर्शियल पेपर्स आणि इतर डेट सिक्युरिटीज जे 91 दिवसात परिपक्व होतात त्यामुळं हे अधिक सुरक्षित समजले जातात.
आपात्कालीन निधी सुरक्षितपणे गुंतवण्यासाठी फिक्स्ड डिपॉजिट, लिक्विड म्युच्युअल फंड असे तुलनेत जोखीम नसलेल्या इंस्ट्रुमेंट्स (secure instruments to park your emergency fund) सुचविल्या जातात आणि त्यातल्या त्यांत फिक्स्ड डिपॉजिटपेक्षा लिक्विड म्युच्युअल फंड आपल्याला थोडा जास्त परतावा देऊ शकतात असा आतापर्यंतचा डेटा सांगतो – पण वाढती महागाई लक्षात घेता लिक्विड फंड महागाईला पुरक परतावा देतात का? Does Liquid Fund beats Inflation in terms of returns?
लिक्विड फंडात गुंतवणूक करताना परताव्याच्या गोष्टींचा विचार का करू नये? Why you should not think about returns while investing in Liquid Funds
लिक्विड फंडांची रचना आणि काम करण्याची पद्धती महागाई पुरक परतावा देण्यासाठी नाहीत आणि सध्याच्या कमी व्याजदराच्या वातावरणात ते महागाईवर मात करू शकेल इतका परतावा देण्यासाठी सक्षम नाहीत. तथापि, लिक्विड फंड बँक खात्यातून किंवा फिक्स्ड डिपॉजिटमधुन मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा थोडे चांगले रिटर्न देऊ शकतात शिवाय कमी जोखीम असलेल्या सरकारी इंस्ट्रुमेंट्स मध्ये पैसे गुंतवत असल्यामुळें पैसे बुडण्याची भीती नाही.
आपत्कालीन निधीच्या गुंतवणुकीसाठी लिक्विड फंडात गुंतवणूक करताना परतावा हा नेहमीच दुय्यम निकष असला पाहिजे. तुम्हाला चांगली रेटिंग असलेला आणि परताव्यामध्ये सातत्य असणारा फंड शोधावा लागेल. म्हणून, जोपर्यंत एखादा फंड बचत बँक खात्यापेक्षा किरकोळ चांगला परतावा देतो, तोपर्यंत तुम्ही त्याचा विचार करू शकता.