नुकसान टाळण्यासाठी मार्च महिन्यात 6 काम संपवा (6 Important actions you need to take before March 31)

२०२१-२२ या आर्थिक वित्त वर्षाचा हा शेवटचा महिना आहे आणि काही महत्वाच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी अजूनही तुमच्याकडे एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. या पैकी कुठल्या गोष्टींची पूर्तता तुम्ही अजूनही केली नसेल तर तुम्हाला काही प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकते.

6 Important actions you need to take before March 31

नुकसान टाळण्यासाठी मार्च महिन्यात 6 काम संपवा (6 Important actions you need to take before March 31)

१. आधार आणि पॅनकार्ड लिंक करा | Link Aadhar and Pan card

भारत सरकारने २०२१ वर्ष दरम्यान आधारला प्रत्येक भारतीय नागरिकासाठी प्राथमिक फोटो ओळखपत्र म्हणुन मान्यता आणि अनिवार्य दिलेली आहे. कुठलीही आर्थिक सेवा आणि सरकार पुरस्कृत योजनावगरैचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येकाने एलन आधार क्रमांक हा पॅन कार्ड, बँक खाते, पोस्टातील खाती आणि ज्या ठिकाणी ची आवश्यकता लागू शकते अश्या सर्व ठिकाणी जोडून घेणं बंधनकारक केलेला आहे.

आधी निर्देश दिल्याप्रमाणे काही वेळेला यासाठी वाढीव मुदत सुद्धा देण्यात आलेली होती परंतु अशी महत्वाची काम शक्य असेल तितक्या लवकर हळवेगळी केलेली बरी – तेव्हा तुम्ही जर अजूनही तुमचा आधार क्रमांक या सेवासोबत जोडून घेतलेला नसेल तर तो जोडून घ्या. अन्यथा तुम्हांला काही सेवांपासुन वंचित राहावं लागू शकत.

आधार आणि पॅनकार्ड संलग्न करून घेण्याची शेवटची मुदत ३१ मार्च आहे आणि तुम्हांला काही कारणास्तव हे शक्य झालं नाही तर मग मात्र तुमचं पॅनकार्ड रद्द होऊ शकत आणि याचा परिणाम तुम्हाला २०% दराने TDS भरावा लागू शकतो.

२. इन्कम टॅक्स रिटर्न भरा | File Income Tax Return Or Amendments

मागच्या आर्थिक वर्ष २०१९-२०२० साठी जर तुमच्या काढून काही गफलत झालेली असेल तर तुम्ही सुधारित रिटन्स ३१ मार्च पर्यंत भरू शकता.

आर्थिक वर्ष २०१९-२०२० जण आपण भरलेलाच नसेल तर १०,००० रुपयांच्या दंडाच्या रकमेसह ३१ मार्च पर्यंत आपण तो जमा करू शकता.

३. आयकर वाचवण्यासाठी गुंतवणूक | Invest for Tax Savings

भारताच्या आयकर कायद्यानुसार तुम्हांला 80D / 80D कलमांमार्फत वेगवेगळ्या कर सवलती दिल्या जातात. तुमच्या सद्यस्थितीतील आर्थिक आवकनुसार जर तुम्ही या कारसवलतींचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ३१ मार्च पर्यन्त त्यासाठी गुंतवणूक करू शकता. ३१ मार्च नंतर केलेली गुंतवणूक चालू वर्षाच्या वाजवटीमध्ये ग्राह्य धरली जाणार नाही – पण पुढील वर्षी तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता.

४. पी.पी.एफ., सुकन्या समृद्धी योजनांमध्ये गुंतवणूक करा | Invest in PPF Or Sukanya Samruddhi Scheme

जर तुम्ही पब्लिक प्रॉविडेंट फंड (PPF), नॅशनल पेंशन स्कीम (NPS) किंवा सुकन्या समृद्धि योजना (SSY) यामध्ये गुंतवणूक करत असाल तर कर वाजवटीसाठी पात्र ठरण्यासाठी तुम्ही यान पैसे टाकू शकता.

काही कारणासाठी जर तुम्हांला या योजनांमध्ये जास्त पैसे भरता येत नसतील तर तुम्ही या योजनांमध्ये ठरवलेली किमान रक्कम भरून हि खाती सुरु ठेवु शकता – जेणेकरून ती निष्क्रिय होणार नाहीत.

लक्षात ठेवा, कुठल्याही कारणांमुळे जय हि खाती निष्क्रिय झालीत तर त्यासाठी चक्रवाढ व्याज लागू होत नाही – म्हणून किमान रक्कम तरी भरावी लागेल.

प्रति वर्ष किती किमान रकमेची आवश्यकता आहे?

 • पब्लिक प्रॉविडेंट फंड (PPF) – ₹५००
 • सुकन्या समृद्धि योजना (SSY) – ₹२५०
 • नॅशनल पेंशन स्कीम (NPS) – टायर १ साठी ₹५०० आणि टायर २ साठी ₹२५०

जर आपण किमान रक्कम सुद्धा भरण्यास विसरल्यार ठराविक दंड भरून हि खाती नंतर पुन्हा सक्रिय करून घेऊ शकता.

५. नोकरीच्या नवीन ठिकाणी फॉर्म १२बी जमा करा | Submit Form 12B to New Employer

चालू आर्थिक वर्षांमध्ये जर तुम्ही नवीन नोकरीला सुरवात केलेली असेल तर तुम्हाला तुमच्या नवीन कामाच्या ठिकाणी फॉर्म १२बी (Form 12B) जमा कारण आयकर अधिनियम 26A नुसार आवश्यक आहे (पण बंधनकारक नाही).

फॉर्म १२बी तुमच्या आधीच्या नोकरीतील उत्पन्नाची माहिती नवीन कंपनीमध्ये देते जेणेकरून तुम्ही योग्य TDS भरू शकाल. अन्यथा नवीन कंपनीमध्ये तुमचा अधिकचा TDS कापला जाऊ शकतो.

तुम्ही आयकर विभागाच्या ऑफिशिअल वेबसाइटवरून डाउनलोड करून, त्यात स्वतःच्या आधीच्या कंपनीतील इन्कम, पी.एफ. (Provident Fund) आणि आधीच्या कामाच्या ठिकाणी कापला गेलेला TDS इत्यादी वगैरेंची माहिती भरून नवीन कंपनी मध्ये जमा करू शकता.

६. KYC अपडेट करून घ्या | Update your KYC

KYC म्हणजेच कस्टमर म्हणून तुमची ओळख बँकेला पटवून द्यावी लागते. जर तुमची KYC बँकेकडे अपडेट नसेल तर मात्र तुमचं खात निष्क्रिय केलं जाईल. तुमचा फोटो आयडी( Photo Id), सध्याचा आणि कायम रहिवासाचा पत्ता (Current & Permanent Residential Address), मोबाइल आणि इमेल आणि सर्वात मुख्य म्हणजे तुमचा आधार क्रमांक (Aadhar Card) तुम्हाला बँकेत देऊन तुमची अपडेट करून घ्यायची आहे.

बँक खात्यासोबतच जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करत असाल तरी सुद्धा तुम्हला तुमची KYC अपडेट करून घ्यावी लागेल अन्यथा तुमचं डी-मॅट आणि ट्रेडिंग अकाउंट KYC सबमिट करेपर्यंत निष्क्रिय करण्यात येईल.

KYC साठी लागणारी कागदपत्र –

 • सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
 • आधार कार्ड (Original & Self attested copy)
 • पॅन क्रमांकासाठी पॅनकार्ड – पॅनकार्डाला आता फोटो आयडी म्हणुन स्वीकारलं जात नाही.
 • कायम रहिवासी पत्ता – (Original & Self attested copy)
  • भाडेकरार किंवा लीज अग्रीमेंट (Rental / Lease Agreement)
  • पासपोर्ट
  • ड्रायविंग लायसन्स
  • वोटर आयडी
  • रेशन कार्ड
  • युटिलिटी बिल (पोस्टपेड मोबाईल बिल/लाइट बिल/ गॅस)
  • प्रॉपर्टी टॅक्स पावती
 • सध्याचा रहिवासी पत्ता

तेव्हा त्वरा करा आणि यापैकी तुमची कुठलीही काम राहिलेली असतील तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या

या लेखांत पुरवलेली माहिती हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. हि माहिती वाचकांच्या उपयोगासाठी, शैक्षणिक उद्देशासाठी आणि अर्थविषयक सजगता निर्मान करण्यासाठी दिलेली आहे. तरी, वाचकांनी आपल्या आर्थिक परिस्थिती आणि गरजांचा योग्य अभ्यास करून मगच स्वतःच्या गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा – आम्ही वाचकांनी केलेल्या कुठल्याही गुंतवणुकीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आमच्या Terms & Conditions वाचा.

.