Kalyan Jewellers Market Update | कल्याण ज्वेलर्स मार्केट अपडेट

Stock Market Live, Kalyan Jewellers Update | सोनं आणि आपण भारतीयांचं नेहमीच एक आश्वासक नातं राहिलेलं आहे. असं म्हणतात कि भारतीयांच्या घरांमध्ये असलेलं सोन्याचं प्रमाण जे जगात सर्वाधिक आहे. कारण कुठलाही असो पण आपण भारतीय सोन्यात गुंतवणूक करतोच जी आपल्याला मिरवायला आणि अडीअडचणीच्या वेळेस काम सुद्धा येते.

सोन्यात कुठल्या पद्धतीने गुंतवणूक करावी याविषयीं सध्याच्या काळात जरी जागृती होत असली आणि त्यांची गुंतवणूक एक डिजिटल सोनं किंवा सोव्हर्जीन गोल्ड बॉण्ड्स मध्ये करण्याचं प्रमाण वाढतं असले तरी सुद्धा पारंपरिक पद्धतीने सोनं विकत घेऊन सुरक्षित ठेवण्याची कवायत करणाऱ्यांचं प्रमाण अजूनही जास्तच आहे.

या लेखात आपण सोन्यात नाही तर सोन्यासारख्या शेअर मध्ये गुंतवणुकीबद्दल बघणार आहोत.

Kalyan Jewellers | कल्याण ज्वेलर्स

कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewellers Share Price) हा भारतातील एक पारंपरिक दुकानं आणि ऑनलाईन व्यवसायात स्थिरस्थावर झालेला आघाडीचा ब्रँड आहे.

भारतात सध्या लग्नसराईच्या काळात आणि जगाच्या तुलनेत भारताची आर्थिक परिस्थिती त्यामानानं स्थिर असेल्या कारणांमुळे सोन्यात किंवा दागदागिन्यांमध्ये गुंतवणूकच प्रमाण वाढले आहे त्यामुळं व्यावसायिक तेजीमुळे या शेअर्स मध्ये गेल्या काही काळापासून उत्तम तेजी दिसून येते आहे.

मागील एक महिन्यांचा शेअर्सचा आलेख पाहिल्यास कल्याण ज्वेलर्सने (Kalyan Jewellers Shared Price)  आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास ३४% परतावा दिलेला आहे.

साधारण महिन्यापूर्वी ९८ रुपयांच्या आसपास ट्रेंड करत असलेले कल्याण ज्वेलर्सचे शेअर्स, डिसेम्बर ३०, २०२२ रोजी ०.०४% घसरणींसह १२६ रुपयांवर बंद झालेत. आघाडीच्या ब्रोकिंग फर्म्स या समभागात तेजी बद्दल अजून उत्सुक असून येणाऱ्या वेळेत यामध्ये गुंतवणुकीला रिकमेंड करीत आहेत.

 

या लेखांत पुरवलेली माहिती हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. हि माहिती वाचकांच्या उपयोगासाठी, शैक्षणिक उद्देशासाठी आणि अर्थविषयक सजगता निर्मान करण्यासाठी दिलेली आहे. तरी, वाचकांनी आपल्या आर्थिक परिस्थिती आणि गरजांचा योग्य अभ्यास करून मगच स्वतःच्या गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा - आम्ही वाचकांनी केलेल्या कुठल्याही गुंतवणुकीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आमच्या Terms & Conditions वाचा.