गेस्ट पोस्ट – पैसाअडका
तुमच्या लेखनाची आवड जोपासण्यासाठी जर तुमच्याकडे स्वतःच व्यासपीठ जसे कि ब्लॉग नसेल तर तुमचे लेख आमच्या पैसाअडका आमच्या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी तुमचं स्वागत आहे. गेस्ट पोस्ट लिहिणं हे ऑनलाईन लिखाण प्रकाशित करण्याचा एक उत्तम पर्याय आहे.
तुम्ही हे वाचताय याचाच अर्थ तुम्ही आमचा हा ब्लॉग नक्की वाचलेला असेल – तुमच्या लक्षात आलेले असेलच कि आम्ही या ब्लॉगवर अर्थ, पर्सनल फायनान्स या विषयावरील माहिती आपल्या मायबोली मराठीमध्ये सोप्या भाषेत, शक्य होईल तितके क्लिष्ट संज्ञा टाळून देण्याचा प्रयन्त करील आहोत. तुम्ही तुमचे लिखाण या संदर्भातील विषयांवर असेल तर नक्कीच आम्हांला पाठवू शकता.
तुमचे लिखाण जर आमच्या ब्लॉगच्या नियमांत बसत असेल तर तुमच्या नावानिशी ते प्रकाशित केले जाईल.
तुमचा स्वतःचा ब्लॉग असेल तर गेस्ट ब्लॉगिंगचा दुसरा फायदा असा कि तुम्ही तुमच्या इतर कन्टेन्ट सोबत बॅकलिंक बनवू शकता – म्हणजे तुमच्या नवीन किंवा सध्याच्या ब्लॉगवर ट्रॅफिक वाढवण्यासाठी इतर प्रस्थापित असलेल्या ब्लॉगसाइट्सवर लेख लिहून तुम्ही वाचकांना तुमच्या ब्लॉगवर आणू शकता. प्रस्थापित ब्लॉग किंवा वेबसाइट्सवर असलेल्या ऑरगॅनिक ट्रॅफिक असलेल्या मोठ्या वाचकवर्गापर्यंत तुमचा ब्लॉग पोचवण्यासाठी हि एक अतिशय परिणामकारक पद्धत आहे.
तुमचे लेख पैसाअडका या व्यासपीठावर प्रकाशित करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन केल्यास आपण आपले लेख आपल्या नावानिशी आमच्या व्यासपीठावर प्रकाशित करू शकाल.
गेस्ट ब्लॉगिंगसाठी काही मार्गदर्शक सुचना (Guest Blogging Guidelines) :
- लेखातील शब्दांची संख्या कमीत कमी ८००-१००० असली पाहिजे. व्याकरणातील चुका नकोत.
- तुमच्या लेखात काही संदर्भ असतील तर तुम्ही त्या लिंक्स संमीलित करू शकता.
- तुम्ही पाठवलेला लेक तुमचा स्वतःचा हवा, कुठून कॉपी केलेला नको.
- तुमच्या लेखात वापरलेल्या ईमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ इत्यादी कुठल्या कॉपीराइटचे उल्लंघन होत नाहीये याची तुम्हाला खात्री करावी लागेल.
- तुम्ही दुसऱ्या भाषेतून लेख अनुवादित करणार असाल तर यथायोग्य आणि अर्थपुर्ण अनुवाद असला पाहिजे, फक्त गुगल ट्रान्सलेट वापरून केलेली नक्कल नको. तसेच मूळ लेखकांच्या परवानगीने ती लिंकसुद्धा संमीलित करावी लागेल.
- तुमच्या लेखात तुम्ही अफिलिएट लिंक सम्मीलित करू शकता पण त्यांची संख्या एक लेखात एका पेक्षा अधिक नको.
- आमच्या सध्याच्या लेखांत तुम्हांला इंटर्नल लिंक ठेवावी लागेल.
गेस्ट पोस्ट लिहिण्यासाठी सध्या आम्ही या व्यासपीठावर ठराविक विषयांना प्राधान्य देतो तेव्हा तुमच्या लिखाणाचा विषय आमच्या सध्याच्या साच्यात बसणार हवा. गेस्ट पोस्ट लिहिण्यासाठी तुम्ही या विषयांचा विचार करू शकता, तुम्हांला या विषय व्यतिरिक्त सुद्धा विषयाची निवड करायची असेल तरी काहीही हरकत नाही तुम्ही तुमचा लेख पाठवल्यानंतर संपर्क साधू शकता.
- पर्सनल फायनान्स (Personal Finance in Marathi)
- पर्सनल फायनान्स किंवा अर्थविषयक पुस्तक समीक्षा (Book reviews in Marathi)
- तुमचे गुंतवणूक विषयीचे अनुभव (Your Experiences with Money & Investments)
तुमचे लेख सबमिट करण्यासाठी या फॉर्मचा वापर करा किंवा संपर्क साधा.