जीवनात आर्थिक चढ-उतार येताच असतात आणि याचा अनुभव आपण सर्वानी नुकताच आलेल्या कोरोना परिस्थितीमध्ये घेतलेलाच आहे. आकस्मितपणें उद्भवणारी अशी आर्थिक संकट आपला सर्व आर्थिक बिघडवुन ठेवतात आणि अश्या गोष्टींसाठी जर तुम्ही योग्य तजवीज केलेली नसेल तर त्यांतुन बाहेर पडणं तितकसं सोपं नाही.
थोडा थोडा करून आपण जमवलेला पैसा अश्या आर्थिक संकटांमध्ये अचानक खर्च होऊन जातो आणि आर्थिक जीवनात आपण केलेली प्रगती अगदि थोड्याचं वेळात नाहीशी होते – अश्या घटना टाळण्यासाठी योग्य आर्थिक नियोजनाची नितांत आवश्यकता प्रत्येकालाच आहे.
जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आणि तुम्ही त्यासाठी आर्थिकदृष्ट्या तयार नसाल परिस्थिती फक्त तणावपूर्णच नसते पण त्याचे गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतात. तुम्हाला आपत्कालीन निधीची गरज आहेच आणि हे मान्य करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.
इमर्जन्सी फंड – तुम्हाला त्याची गरज का आहे? Emergency Fund in Marathi
अनपेक्षित आर्थिक गरज उद्भवल्यास तुमचा आपत्कालीन निधी तुम्हाला कव्हर करतो आणि तुम्हाला कर्जात जाण्यापासून रोखू शकतो. तुम्ही तुमची नोकरी गमावल्यास, काम करण्यासाठी खूप आजारी पडल्यास किंवा एखादी मोठी कार किंवा घराची दुरुस्ती करावी लागत असल्यास हे देखील हा आपत्कालीन निधी तुम्हाला मदतीला पडेल.
आपल्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आपत्कालीन निधी असणं फार गरजेचं आहे.
अनपेक्षितपणे येणारे आजार, खर्च किंवा एखादी आर्थिक गरज उद्भवल्यास आपण जमा केलेला आपत्कालीन निधी आपल्या कमी येतो आणि घाईत कर्ज किंवा उधारी घेण्यापासुन आपली सुटका होऊ शकते. आजकाल आपण बघतोच कुठल्याही क्षेत्रांत नोकरीची हमी नाही आणि कधीही आपल्या हातात पिंक स्लिप येऊ शकते किंवा अपघात किंवा आकस्मितपणे होणारे आजारांचं डायग्नोसिस किंवा एखादी मोठी कार किंवा घराची दुरुस्ती करावी लागत असल्यास हे देखील हा आपत्कालीन निधी तुम्हाला मदतीला पडेल पण आपण अश्या खर्चासाठी आधीच तजवीज केलेली नसेल तर आपल्याकडे फक्त आपली सेविंग वापराने किंवा कर्ज घेणें हाच एक पर्याय उरतो.
याखालीं पैकी कुठलंही कारण जर तुम्ही बघत असाल तर तुम्ही आपत्कालीन निधी उभारणीसाठी आताच काम सुरु करणें गरजेचं आहे –
१. तुमच्याकडे फक्त एकच उत्पन्नाचा स्रोत आहे (Do you have only source of income)
आपत्कालीन निधी का असावा यासाठी हे अतिशय योग्य आणि सर्वात महत्वाचं कारण आहे -उत्पन्नाचा फक्त एकचं स्रोत असणं किंवा नियमित उत्पन्नाची खात्री नसणं. काही कारणांमुळे जर तुमचं उत्पन्न थांबलं किंवा कमी झालं तर आपल्या रोजच्या जीवनावश्यक गरजांवर खर्च करण्यासाठी पैशाची कमतरता जाणवू नये कारण आपल्या परिवाराच्या गरजा आपण थांबवू शकत नाही.
अश्या वेळेला उत्पन्नाचा स्रोत पुन्हा स्थिरस्थावर होत नाही तोपर्यन्त हा आपत्कालीन निधी तुम्हांला तुमच्या परिवाराच्या गरजा भागवण्यासाठी करायला मदत करेल.
२. तुम्ही स्वयंरोजगार किंवा कंत्राटदार आहात ( Are you a freelancer)
स्वयंरोजगार किंवा कंत्राटदार म्हणून काम करतांना लक्षात घेण्याची महत्वाची गोष्ट म्हणजेच तुम्हांला तुमच्या उत्पन्नाच्या स्थिरतेबाबत खात्री देता येत नाही. अनेक घटकांच्या परिणामानुसार तुमचा उत्पन्न कधी कमी तर कधी फार चांगलं असू शकेल.
त्याच प्रमाणे तुम्हाला व्यवसायाच्या गरजेनुसार वेळोवेळी पैश्यांची गरज सुद्धा लागेल जी तुम्ही जर योग्य नियोजन केले नसेल तर तुमच्या साठवलेल्या पैश्यातून भागवावी लागू शकते. अशा वेळेला बाजूला ठेवलेला आपत्कालीन निधी तुमच्या कामीयेईल.
३. तुम्ही कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत आहात
घरांच्या किंमती भरमसाठ वाढल्यानंतर आजकाल गृहकर्ज असतेच अश्या वेळेला अचानक गरज पडलीच तर बॅहॅटेक जण थोडं कर वगैरे घेऊन आपली नाद भागवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा अश्या गरजांसाठी तुम्ही आपत्कालीन निधीची योजना केली असेल तर तुम्ही तुमच्या डोक्यावरील कर्जाचा भार वाढण्यापासून टाळू शकता. नवीन कर्जामुळे तुमची सध्याची गरज तर भागेल पण दीर्घकाळात तुम्हाला कराव्या लागणाऱ्या वयाच्या परताव्यानुसार तुमचं आर्थिक नुकसानच होईल.
४. तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याला वैद्यकीय समस्या आहेत.
आजकाल वैद्यकीय उपचारांचा वाढलेला खर्च बघितला खरंच ताण येतो. कुठल्याही छोट्या आजारपणासाठी सुद्धा हजारांत खर्च होतोच मग अश्या वेळेला जात आपल्या कटुंबामध्ये कुणाला लाही आजारपणाच्या समस्या असतील तर त्यासाठी पैश्याची वेगळी सोया असेलेली बरी. अचानक जर खर्चाची गरज पडलीच तर तुमच्या नेहमीच्या खर्चच्या शिलकीला तुम्हांला हात लावण्याची गरज पडणार नाही तसेच तुमची नाद पण भागेल. सध्या घराघरात असणारे डायबिटीस किंवा रक्तदाब या आजारांच्या गोळ्याचा खर्च किंवा रेगुलर चेकअप आणि मेडिकल टेस्ट हा खर्च सुद्धा नियमित करावा लागतोच तेव्हा वेळ असतानाच यांची तजवीज केलेली चांगली.
५. तुम्ही आर्थिक ध्येयासाठी बचत करत आहात.
गुंतवणुकीमध्ये दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत आणि त्या म्हणजे गुंतवणुकीत सातत्य आणि विशिष्ट उद्दिष्ट समोर ठेऊन केलेली गुंतवणूक. या दोन्ही गोष्टी करताना जर तुम्हांला अचानक खर्चाची गरज पडली आणि तुमच्या कडे आपत्कालीन निधी नसेल तर तुम्हांला तुमचा या गुंतवणुकीतून पैसे काढावे लागतील –
अश्या पद्धतीने या नितमीय गुंतवणुकीतून होणारी गळती तुम्हाला दीर्घ कालीन उद्देश गाठण्यामध्ये अडचणीची ठरू शकेल.
कारण कुठलंही का असेना योग्य आर्थिक नियोजनातून तुम्ही तुमच्या परिवाराच्या सर्व गरजा विनासायास पूर्ण करू शकण्यासाठी, उत्पन्न बंद झाल्यास किंवा कमी झाल्यास तुमची सध्याचे राहणीमान आहे त्याच पद्धतीने सुरु ठेवण्यासाठी आपत्कालीन निधी तुमचा सर्वात भरवशाचा आणि उपयोगी मित्र समजा – त्याच महत्व कमी लेखुन किंवा त्यांकडे दुर्लक्ष करणं तुमची सर्वात मोठी चूक ठरेल.
आता, आपत्कालीन निधीचे महत्व तर आपण पाहिलेत पण –
आपत्कालीन निधी कसा उभारावा ( How to build Emergency Fund)
पर्सनल फायनान्सचे नियोजन करतांना प्लॅनर्स तुम्हांला तुमच्या सध्याचा मासिक खर्चाच्या साधारपणे ६ ते ८ पटीमध्ये असणाऱ्या मूल्याची रक्कम आपत्कालीन निधी म्हणून वेगळी गुंतवण्याचा सल्ला देतात. याचाच अर्थ कुठल्याही करणं तुमचा उत्पन्न बंद किंवा कमी झालात तरीसुद्धा तुम्ही तुमची सध्याची जीवनशैली जशी सुरु आहे तशी ६ ते ८ महिन्यांपर्यंत आरामात सुरु ठेऊ शकाल आणि या दरम्यात तुमचा उत्पन्नाचा स्रोत पुन्हा सुरु करण्यावर लक्ष केंद्रित करू शकाल – पण हि तरतूद तुम्ही केलेली नसेल तर मग मात्र तुम्हांला तुमच्या सध्याचा गरजांमध्ये कमी करावी लागेल. अशी गुंतवणूक करताना बचत खाते हा एक चांगला पर्याय आहे. तथापि, तुम्ही शेवटी तुमचा निधी जेथे पार्क कराल त्या बँकेने दिलेला व्याजदर विचारात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आपत्कालीन निधीची तरलता (Liquidity of Emergency Fund) किंवा त्वरित उपलब्धता हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.
तुम्ही तुमचा इमर्जन्सी फंड कुठेही गुंतवला असेल तो तुमची गरज असेल तेव्हा तो तुम्हांला काढता यायला हवा. तुमचा आपत्कालीन निधी जर तुम्हाला गरजेच्या वेळेला उपलब्ध होऊ शकत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही.
अशी बरीच गुंतवणुकीची साधन आहेत ज्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हांला काहीकालाच बंधन असते जसे कि स्टोक्स किंवा म्युच्युअल फंड – उठून पैसे काढण्यासाठी तुम्हाला कमीत कमी T+२/3 दिवसांची वाट पाहावी लागते आणि हि साधन या गुंतवणुकीसाठी योग्य ठरत नाहीत.
आपत्कालीन निधीसाठी गुंतवणूक करण्याच्या टिप्स (Tips for Emergency Fund investment in Marathi) –
- तुमच्या एक महिन्याचा खर्चा इतकी रक्कम तुमच्या बचत खात्यांत वेगळी ठेवा.
- मुदत ठेवी : बचत खात्यांवरील कमी व्याजदरांपेक्षा चांगला पर्याय. तुम्ही ठराविक रक्कम मुदत ठेवींमध्ये (FD) ठेवल्यास, तुम्हांला मिळणारा व्याजदर तुम्हाला बचत बँक खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा किंचित जास्त असेल. मुदत ठेवी तुम्हाला चांगली तरलता देखील देते कारण मुदत ठेवी तुम्ही हवी तेव्हा बंद करून पैसे तुमच्या खात्यांत वळते करून घेऊ शकता. तुम्ही ते ऑनलाइन बँकिंगद्वारे केल्यास, तुम्ही बँकेच्या सुट्टीच्या दिवशीही ते ऑनलाइन रद्द करू शकता. तथापि, तुमच्याकडे ऑफलाइन एफडी असल्यास तुम्ही स्वीप-इन सुविधा घेऊ शकता जिथे तुम्ही सुट्टीच्या दिवशीही पैसे काढता तेव्हा एफडी आपोआप खंडित होऊ शकते.
- काही इक्विटी भाग: लिक्विड म्युच्युअल फंड. अनेक तज्ञ लोकांना त्यांच्या आपत्कालीन निधीचा काही भाग लिक्विड म्युच्युअल फंडामध्ये ठेवण्याचा सल्ला देतात कारण ते इतर कर्ज गुंतवणुकीपेक्षा सुरक्षित मानले जातात. ते सामान्यत: बचत बँक खात्यापेक्षा जास्त परतावा देण्यासाठी ओळखले जातात. तथापि, तुम्हाला हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे की ऑनलाइन पैसे काढणे देखील तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी 1-3 दिवस लागू शकतात. काही म्युच्युअल फंड एटीएम कार्ड सुविधा देतात जे प्रति स्कीम पैसे काढण्यासाठी दररोज 50,000 रुपयांपर्यंत परवानगी देतात. बँक एफडीला रु. 5 लाखांचे ठेव विमा संरक्षण मिळते, तर लिक्विड फंडासह असे कोणतेही संरक्षण उपलब्ध नाही. तुमच्या जोखमीच्या क्षमतेनुसार, तुम्ही तुमच्या आपत्कालीन निधीचा काही भाग लिक्विड फंडमध्ये ठेवू शकता.