रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट(Reliance Strategic Investment) म्हणून ओळखल्या जाणार्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस(JIO Financial Services) आज दलाल स्ट्रीटमध्ये पदार्पण करणार आहेत. स्टॉकची आधी शोधलेली किंमत 261.85 रुपये आहे, पण ग्रे मार्केटमध्ये हा स्टॉक 300-310 रुपयांवर सूचीबद्ध होऊ शकतो असा अंदाज आहे.
गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रत्येक शेअरसाठी JIOFIN चा एक स्टॉक आहे. रिलायन्सच्या मुख्य व्यासासायातून डिमर्जर झाल्यानंतर साधारण एक महिन्याच्या कालावधीसाठी JIOFIN स्टॉक एक डमी स्टॉक म्हणून घालवल्यानंतर, JFS शेअर्स शेवटी टट्रेड करण्यायोग्य होतील. तथापि, स्क्रिप पुढील 10 ट्रेडिंग दिवसांसाठी ट्रेड-टू-ट्रेड सेगमेंटमध्ये असेल.
JIOFIN चे स्टॉक खरेदी-विक्री केवळ डिलेव्हरी मोड द्वारेच केली जाऊ शकते. येत्या काही काळासाठी JIOFIN स्टॉकचे इंट्राडे व्यवहार शक्य नाहीत.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने JIOFIN चे शेअर्स खरेदी केले आणि त्याच दिवशी ते विकण्याचा प्रयत्न केला, किंवा शेअर्स डिमॅट खात्यात जमा होण्यापूर्वी, ऑर्डर नाकारली जाईल.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉकचे चिन्ह JIOFIN आहे.
JIOFIN बद्दल थोडक्यात
1.5 लाख कोटी रुपयांहून अधिक बाजार भांडवलासह, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस भारतातील दुसरी सर्वात मोठी सूचीबद्ध NBFC बनेल. त्याची मार्केट कॅप ब्रिटानिया, हिरो मोटोकॉर्प आणि ग्रासिम इंडस्ट्रीज सारख्या निफ्टी 50 मोठ्या कंपन्यांपेक्षा जास्त असेल. इंडसइंड बँक, एसबीआय लाइफ आणि एचडीएफसी लाइफ पेक्षा त्याचे मार्केट कॅप देखील जास्त असेल.
निफ्टी आणि सेन्सेक्समधून काढणे
JIO Financial (JIOFIN) ला तिच्या सूचीच्या तिसऱ्या दिवशी दिवस संपल्यानंतर दोन बेंचमार्क निर्देशांकांमधून काढून टाकले जाईल. मुळात, वगळणे 24 ऑगस्ट 2023 रोजी होईल.